Karnataka High Court on Consentual sex and alegationof rape  google image
देश

सहा वर्ष संमतीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या महिलेला बलात्काराचा आरोप करता येणार नाही : हायकोर्ट

फिर्यादी महिलेला श्रीमंत लोकांशी मैत्री करणे, पैसे उकळणे, ब्लॅकमेल करण्याची सवय असल्याचा पुरूषाचा आरोप

Akshay Nirmale

Karnataka High Court News: कायद्याच्या प्रक्रियेच्या गैरवापराचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे उद्धृत करून कर्नाटक उच्च न्यायालयाने एका महिलेला फटकारले आहे. संबंधित महिलेने बेंगळुरूतील एका पुरूषाविरोधात दाखल केलेले दोन फौजदारी खटले न्यायालयाने रद्द केले. सहा वर्षे नातेसंबंधात राहिल्यानंतर लग्नाच्या वचनाचा भंग केल्याचा आरोप महिलेने पुरूषावर केला होता.

सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर एक दोन नव्हे तर सहा वर्षे दोघांमध्ये सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. तक्रारीत याचा सर्व तपशील आहे. दोघांमधील जवळीक कमी झाल्यानंतर 27 डिसेंबर 2019 पासून याबाबत महिलेने आरोप करायला सुरवात केली.

6 वर्षे सहमतीने शारीरीक संबंध ठेवल्यानंतर जवळीक कमी होणे याचा अर्थ तो बलात्कार आहे, असा होत नाही, हे पहिल्या दिवसापासून संमतीने केलेले कृत्य होते," असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी म्हटले आहे.

या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अनेक निकाल- प्रमोद सूर्यभान पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर काही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत न्यायाधीश म्हणाले की, लैंगिक संबंध सहा वर्षे राहिले. आयपीसीच्या कलम ३७६ अन्वये तो बलात्कार म्हणता येणार नाही.

दावणगेरे येथील महिलेने बेंगळुरू शहरातील इंदिरानगर पोलिसांत 2021 मध्ये याचिकाकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

महिलेच्या तक्रारीनुसार दोघांमध्ये 2013 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. शेजारी राहत असल्याने आणि चांगला शेफ असल्याने ती त्याच्या घरी जायची. दोघांमध्ये खाणे-पिणे शारीरिक संबंध असायचे.

सहा वर्षे लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने लग्नाचे वचन मोडले, असे महिलेने म्हटले आहे.

8 मार्च 2021 रोजी तिने इंदिरानगर पोलिसात फसवणूक आणि गुन्हेगारी धमकावल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. दावणगेरे येथे जाऊन त्याच आरोपांच्या आधारे मारहाण आणि बलात्काराची दुसरी तक्रारही नोंदवली. दुसऱ्या तक्रारीत त्याच्याविरोधात आणखी एका महिलेचेही नाव आहे. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

पुरूषासह सहआरोपी महिलेने या कारवाईला याचिकेतून आव्हान दिले. फिर्यादी महिलेला श्रीमंत लोकांशी मैत्री करणे, पैसे उकळणे आणि गुन्हे नोंदवून ब्लॅकमेल करण्याची सवय असल्याचा आरोप त्यांनी केला.

याच महिलेचे आणखी एका पुरुषाशी शारीरिक संबंध होते आणि नंतर त्या पुरूषाविरोधातही तिने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; पंतप्रधान मोदी आणि CM सावंतांचा 'व्हिडिओ कॉल' व्हायरल

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

Viral Video: दिवाळी सेलमध्ये 'रणकंदन', साडीसाठी दोन महिला एकमेकींवर तुटून पडल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT