Karnataka Assembly Election ANI
देश

Karnataka Assembly Election: काँग्रेस काळात लाईट नसल्यामुळे लोकसंख्या वाढली, भाजप मंत्र्यांचे वक्तव्य

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे.

Pramod Yadav

Karnataka Assembly Election: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढू लागले आहे. दररोज वेगवेगळ्या पक्षांचे नेते येथे काही ना काही विधाने करत आहेत.

काँग्रेस आणि भाजप व विविध पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात आता मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक वक्तव्य केले आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

कर्नाटकातील हसन येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी प्रचारासाठी पोहोचले होते. "काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात कमी वीज दिली होती. काँग्रेस सर्वसामान्यांना पुरेशी वीज पुरवू न शकल्याने लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली." असे वक्तव्य जोशी यांनी केले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात भाजप नेत्यांचे दौरे सुरू आहेत. याच भागात 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या निवडणूक राज्याचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मार्च रोजी कर्नाटकातील मंड्या आणि हुबळी-धारवाड जिल्ह्यांना भेट देणार आहेत. गेल्या रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.

नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेकवेळा कर्नाटक राज्याला भेट देऊन विविध प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटन केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यात आपला प्रचार वाढवला असून पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या जाहीर सभांनाही संबोधित केले आहे.

मे महिन्यापर्यंत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले, “पंतप्रधान 12 मार्च रोजी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकला भेट देतील आणि त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास हुबळी येथे पोहोचतील, जिथे ते IIT धारवाडचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते जवळच्या ठिकाणी मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT