Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

Congress Working Committee: काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; गोव्यातील एका नेत्याचा यादीत समावेश

39 सदस्यांच्या या समितीत सोनिया, राहुल, प्रियांका यांचा समावेश आहे.

Rajat Sawant

Congress Announces Reconstituted Working Committee: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. 39 सदस्यांच्या या समितीत सोनिया, राहुल, प्रियांका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही समितीत कायम ठेवण्यात आले आहे.

तसेच गोव्‍याचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर ‘सीडब्‍ल्‍यूसी’वर कायमस्‍वरुपी निमंत्रित म्‍हणून राहणार आहेत.

मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे शशी थरूर यांचाही कार्यकारिणीत समावेश केला आहे. काँग्रेस कार्यकारिणी मध्ये एकूण 84 नावे आहेत. यामध्ये काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, स्थायी निमंत्रित, सरचिटणीस, विशेष निमंत्रित आणि प्रभारी यांच्या नावांचा समावेश आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 23 सदस्यीय काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून त्याजागी 47 सदस्यीय संचालन समिती नेमली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT