CM Pramod Sawant Madhya Pradesh Visit:
CM Pramod Sawant Madhya Pradesh Visit: Dainik Gomantak
देश

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी केले मध्य प्रदेशातील कार्यकर्त्याच्या घरी भोजन

Akshay Nirmale

CM Pramod Sawant Madhya Pradesh Visit: मध्य प्रदेशच्या विधानसभेतील 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर या काळात मतदान होणार आहे. राज्यातील सत्ता राखण्यासाठी भाजपने चांगलाच जोर लावला आहे.

देशभरातील भाजपचे स्टार कॅम्पेनर (स्टार प्रचारक) मध्य प्रदेशात सभा घेत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील शनिवार-रविवारी मध्यप्रदेशात विविध ठिकाणी संबोधित करताना दिसून आले.

दरम्यान, या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी चहा-नाष्टा आणि भोजनाचा आस्वाद घेतला.

भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडून डॉ. सावंत यांना भोजनाचे आमंत्रण मिळाले होते. तथापि, प्रचार दौरा, सभा, भेटीगाठी अशा व्यस्त वेळापत्रकांतून वेळ काढत त्यांनी काही कार्यकर्त्यांच्या घरी नाष्टा आणि भोजन केले. तसेच कार्यकर्त्यांसमवेत आणि त्यांच्या कुटूंबियांसमवेतही काही वेळ घालवला.

मध्यप्रदेशातील बालाघाट येथील लांजी येथे रामटेककर यांच्या घरी मुख्यमंत्री सावंत यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या भेटीचे फोटो मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत. या कुटूंबियांनी दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले आहेत.

दरम्यान, शनिवारी ते लांजी येथील कारंजा गावात पोहचले. तिथे त्यांनी बालभाऊ देवरस यांना श्रद्धांजली वाहिली. शाळा परिसराची पाहणी केली आणि कारंजा चौकातील सभेला संबोधितही केले.

त्यांनी केंद्राच्या तसेच मध्य प्रदेश सरकारच्या योजनांची माहिती देत राज्यात आणि केंद्रातही पुन्हा भाजप सरकारच येईल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. सावंत यांनी हिंदीसह मराठी भाषेत भाषण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT