Goa Film City: काणकोण येथे फिल्मसिटीसाठी 10 लाख चौ.मी जागा निश्चित्त; 5 हजार रोजगार मिळणार

मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती
Goa Film City
Goa Film City Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Film City: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून फिल्म सिटीबाबतची चर्चा सुरू आहे. फिल्मसिटीसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे समोर आल्यानंतर अनेक ठिकाणांहून याला प्रतिसाद मिळाला.

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या काणकोण येथे फिल्मसिटी व्हावी, त्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली होती.

त्यानंतर आता समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या प्रकल्पातून सुमारे 5,000 रोजगार उपलब्ध होतील, असे सांगत काणकोणमधील 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केल्याचे सांगितले.

Goa Film City
Goa Electric Solar Ferry: उंदिर कुडतरताहेत गोव्यातील एकमेव इलेक्ट्रिक सोलर फेरी बोट

फळदेसाई म्हणाले की, फिल्मसिटी उभारल्यानंतर पहिल्या पाच वर्षातच किमान 5000 नोकऱ्या उपलब्ध होतील. त्याचा पर्यटन क्षेत्रावर आणि इतर संबंधित क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होईल. सरतेशेवटी त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे.

या प्रकल्पासाठी काणकोण येथील भगवती पठाराजवळ सुमारे 10 लाख चौरस मीटर जागा निश्चित्त केली आहे. ही जागा कोमुनिदादची आहे.

फिल्मसिटी ही माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची संकल्पना होती. काणकोणमधील स्थानिकांनाही फिल्मसिटीची उत्सुकता आहे.

Goa Film City
Goa Accident: रशियन पर्यटकाच्या भरधाव दुचाकीची महिलेला जोरात धडक; मोरजीमध्ये अपघात

अनेक लोकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याची ऑफर दिली, त्यातील एक प्रस्ताव काणकोणचाही होता, असे ते म्हणाले.

दरम्यान, यापुर्वी काही चित्रपट निर्मात्यांनी, फिल्म सिटीत रोजगार संधींसह ध्वनी मंच, धार्मिक स्थळे, तात्पुरते सेट, प्रशिक्षण संस्था आणि ओपन एअर थिएटर यासारख्या सुविधांची तरतूद सुनिश्चित करावी, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com