Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: अक्रोड फोडण्यासाठी कावळ्याने लढवली शक्कल, मूक्या पक्षाची बुद्धिमत्ता पाहून नेटकरी थक्क; म्हणाले...

Crow Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि रिल्स व्हायरल होत असतात.

Manish Jadhav

Crow Viral Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि रिल्स व्हायरल होत असतात. काही मजेशीर, काही भावनिक तर काही व्हिडिओ असे असतात की, पाहणाऱ्याला विचार करायला लावतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मूक्या पक्षाची बुद्धिमत्ता पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये एक कावळा अक्रोड फोडण्यासाठी युक्तीचा वापर करताना दिसतो. सामान्यतः अक्रोड हे फार कठीण कवचाचे असल्याने त्याला फोडणे सोपे नसते. मात्र या कावळ्याने बुद्धिमत्ता वापरुन विटांखाली अक्रोड ठेवून फोडण्याचा प्रयत्न केला. इतकच नाहीतर तो अक्रोड रस्त्यावर ठेवतो आणि एखादी गाडी त्या अक्रोडवरुन जाईल याची वाट पाहतो.

काही वेळातच एक गाडी त्या अक्रोडवरुन जाते आणि अक्रोड सहज फुटतो. त्यानंतर कावळा तो अक्रोड उचलून खातो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी प्रयत्न आणि बुद्धिमत्ता यांचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, "प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते." माणसालाही प्रेरणा देणारा हा व्हिडिओ सध्या लाखोंच्या संख्येने पाहिला जात आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत की, "हे उदाहरण आपल्या जीवनातही लागू पडते." हा व्हिडिओ केवळ मनोरंजन नसून शिकवण देणारा ठरतो. यामधून धडा मिळतो की, अडचणी कितीही असल्या तरी जर आपण प्रयत्नशील असलो, तर मार्ग नक्कीच सापडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

SCROLL FOR NEXT