Viral Video: गजराज चवताळला! जगन्नाथ रथयात्रेदरम्यान DJ वाजताच हत्तींची सटकली, भाविकांची पळापळ

Jagannath Rath Yatra Elephant Video: शुक्रवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान तीन हत्ती नियंत्रणाबाहेर गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अहमदाबाद पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
Jagannath Rath Yatra Elephant Video
Jagannath Rath Yatra Elephant VideoDainik Gomantak
Published on
Updated on

हिंदू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेपासून सुरू होणारी ही यात्रा देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. आजपासून या वर्षीच्या जगन्नाथ रथयात्रेला देखील मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे. भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

यंदाही रथयात्रेचा उत्सव विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सोशल मिडियावरही या यात्रेचे विविध व्हिडिओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र, गुजरातमधून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या विशेष चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये थरारक दृश्य पाहायला मिळत आहेत.

Jagannath Rath Yatra Elephant Video
Goa Ferryboat: गोमंतकीयांसाठी खुशखबर! राज्‍यात नवीन 5 फेरीबोटी लवकरच येणार; 2 बोटी डिसेंबरपर्यंत सेवेत

पीटीआय या वृत्तसंस्थेने एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, गुजरातमधील रथयात्रेदरम्यान तीन हत्ती अचानक नियंत्रणाबाहेर गेले असल्याचं दिसतं. गर्दीने फुललेल्या रस्त्यावर हत्ती चवताळल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

हत्तींच्या रौद्र रूपामुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. काही ठिकाणी घबरलेल्या लोकांनी दुकानं आणि रस्त्याच्या बाजूला लपण्याचा प्रयत्न केल्याचंही या दृश्यांमध्ये दिसतं.

Jagannath Rath Yatra Elephant Video
Goa Forward: गोवा फॉरवर्डची ‘आमचो आवाज विजय’ मोहीम! जाणून घेणार लोकांचे प्रश्‍न; पेडण्यातून होणार सुरुवात

सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, काही वाहनांचे आणि रथयात्रेच्या सजावटीचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षादलाने तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com