Foster Daughters of CJI Chandrachud Dainik Gomantak
देश

निर्लज्जपणाचा कळस! CJI Chandrachud यांच्या दिव्यांग मुलींवर टीका करत निवृत्त शिक्षकाने तोडले अकलेचे तारे

Sabhapati Mishra: "हे वृद्ध शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे शिक्षण किती हास्यास्पद आणि निरुपयोगी असेल याचा विचार करा! "

Ashutosh Masgaunde

Sabhapati Mishra Criticizing CJI Chandrachud by his foster daughters: एका निवृत्त शिक्षकाने भारताचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांच्या दिव्यांग मुलींबाबत आक्षेपार्ह ट्विट करत टीका केली आहे. यामुळे सभापति मिश्र नावाच्या या निवृत्त शिक्षकावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

खरे तर सीजेआय चंद्रचूड यांना मुले नाहीत. त्यांनी प्रियांका (वय 20) आणि माही (वय 16) या दोन दिव्यांग मुलींना दत्तक घेतले आहे.

सभापति मिश्र नावाच्या या निवृत्त शिक्षकाने सीजेआयय चंद्रचूड, त्यांच्या पत्नी आणि दोन दिव्यांग मुलींचा (Specially Abled) फोटो ट्विट करत, "तुम्ही जसे काम करता, तसेच फळ देव देतो, तुम्ही यांना ओळखत असालच?" असे ट्विट केले होते.

या निवृत्त शिक्षकाच्या ट्विटला निगार परवीन या युजरने सडेतोड उत्तर देत चांगलाच समाचार घेतला.

निगार परवीन म्हणाल्या, " या छायाचित्रात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड दिसत आहेत. बरोबर त्यांच्या पत्नी आणि दोन दत्तक दिव्यांग मुली आहेत.

सभापति मिश्र या छायाचित्राबाबत असे लिहित आहेत, देव तुम्हाला तुमच्या कृतीचे फळ देत असतो" खाली लिहिलंय - तुम्ही ओळखलंच असेल ना?

हे वृद्ध शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे शिक्षण किती हास्यास्पद आणि निरुपयोगी असेल याचा विचार करा! "

सर्वमावेशक चंद्रचूड दांपत्य

भारताचे माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांची पत्नी कल्पना दास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत असताना दोन दिव्यांग मुलींना दत्तक घेतले होते.

CJI हे त्यांच्या सर्वसमावेशकतेसाठी ओळखले जातात आणि समाजातील सर्व घटकांचे, विशेषतः महिला आणि उपेक्षित नागरिकांचे प्रतिनिधित्व सुलभ करण्यावर भर देतात.

आता, त्याला उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या ऑनलाइन द्वेषाचाही सामना करावा लागत आहे.

आंधळा द्वेष आणि मूर्खपणा यात फारसा फरक नाही

"सभापति मिश्र, तुम्ही मानसिक दिवाळखोरीचे बळी झाला आहात, तुम्ही ट्विटर सोडून चिंतन करा, नाहीतर तुमच्या कुटुंबियांनाही अशी भाषा पाहून लाज वाटेल.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी या दोन्ही मुलींना दत्तक घेऊन त्यांचे जीवन समृद्ध केले. आंधळा द्वेष आणि मूर्खपणा यात फारसा फरक नाही." असे ट्विट करत वेदांक सिंह नामक ट्विटर यूजरने या निवृत्त शिक्षकाला फटकारले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

Goa Live News: आज 11 उमेदवारांकडून अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT