JMC Dainik Gomantak
देश

Jammu च्या शहराचे अन् चौकाचे होणार नामांतर ;JMCने मंजूर केला ठराव

जम्मू महानगरपालिका त्यांच्या एका शहराचे आणि चौकाचे नाव आता बदलणार आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू महानगरपालिका (JMC) त्यांच्या एका शहराचे आणि चौकाचे नाव आता बदलणार आहे. आता शेख नगर 'शिवनगर' आणि आम्फल्ला चौक 'हनुमान चौक' म्हणून ओळखला जाणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जेएमसीने यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे. जम्मूचे महापौर चंदर मोहन यांनी ही माहिती दिली आहे. या दोन ठिकाणांच्या नामांतराच्या पुढील प्रक्रियेअंतर्गत आता जम्मू-काश्मीरच्या नागरी सचिवालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. (The city of Jammu will be renamed Resolution approved by JMC)

JMC महापौर चंदर मोहन गुप्ता म्हणाले की, "जम्मू महानगरपालिकेने (JMC) जम्मूमधील 1 शहर आणि 1 चौकाचे नाव बदलण्याचा एकमताने ठराव मंजूर केला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने मांडलेल्या ठरावाचा भाग म्हणून शेख नगरला आता 'शिवनगर' असे संबोधण्यात येईल. याशिवाय, आम्फल्ला चौक या आणखी एका परिसराचे 'हनुमान चौक' असे नामकरण करण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या जम्मू महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शेख नगर आणि आम्फल्ला चौकाच्या नामांतराचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला होता.

बैठकीत भाजपच्या नगरसेविका शारदा कुमारी यांनी ठराव मांडला की, नागरी संस्थेच्या अखत्यारीत येणाऱ्या शेख नगर परिसराचे नाव बदलण्यात यावे आणि त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जम्मू महापालिकेत भाजपचे बहुमत असल्याचे दिसून आले आहे. जेएमसीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडणाऱ्या भाजपच्या नगरसेविका शारदा कुमारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकांची मागणी लक्षात घेऊन या दोन ठिकाणांची नावे बदलण्यात येणार आहेत.

अशा पावलांमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होईल.

जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर म्हणाले की, “लोकांमध्ये फूट पाडून राज्य करायचे हे भाजपचे मुख्य धोरण आहे. ते धर्माच्या नावाखाली लोकांचे ध्रुवीकरण करत असतात. नाव बदलून सर्वसामान्यांचा प्रश्न सुटणार नाहीये. सत्तेवर दुसरा पक्ष आल्यावर ते नाव बदलतील. भाजपने मांडलेले हे उदाहरण साफ चुकीचे आहे. अशा पावलांमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. कडक उन्हात रोजंदारी मजूर रस्त्यावर उतरत असून, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने ठिकाणांची नावे बदलण्याची तयारी सुरु केली आहे.

भाजपशासित राज्यांमध्ये जातीयवादाची घोडदौड सुरूच,

माजी आमदार आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) चे प्रवक्ते फिरदौस टाक यांनी जम्मू महापालिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, "देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये, महामंडळाचा प्रस्ताव फेटाळला जावा.” याचे आश्‍चर्य वाटू नये. त्यांच्यामध्ये कोण जास्त जातीयवादी आहे हे सिद्ध करण्याची स्पर्धा भाजपशासित राज्यांमध्ये आहे. देशातील विकास आणि अर्थव्यवस्थेची स्थिती खालच्या पातळीवर गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT