Prophet Remarks Row: पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक

आज पुन्हा एकदा आंदोलकांनी नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक करून लोकल ट्रेनचे नुकसान केले.
West Bengal
West BengalANI
Published on
Updated on

West Bengal: बंगालमध्ये शुक्रवारी नमाजानंतर झालेल्या निदर्शनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा आंदोलकांनी नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक करून लोकल ट्रेनचे नुकसान केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक केली. (Prophet Remarks Row)

त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण रेल्वे स्टेशनमध्ये घुसले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने फलाटावर उभ्या असणाऱ्या आणि धावत्या ट्रेनवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे लालगोला मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.

10 जून रोजी अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून देशभरात खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 10 जून रोजी पश्चिम बंगालमधील हावडासह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने पाहायला मिळाली. मात्र आता हावडामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकल्याची बातमी समोर आली आहे. येथे जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती पाहता इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com