Mobile Phone Dainik Gomantak
देश

Modi Govt चा ड्रॅगनला दणका, 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या चायनीज फोनवर बंदी?

India Vs China: चिनी मोबाईल फोन भारतात सर्वाधिक विकले जातात.

दैनिक गोमन्तक

India Vs China: चिनी मोबाईल फोन भारतात सर्वाधिक विकले जातात. याचे प्रमुख कारण म्हणजे या मोबाईल फोन्सची स्वस्त किंमत. किफायतशीर किमतीत अनेक फिचर्सच्या उपलब्धतेमुळे चिनी फोनची भारतीय बाजारपेठेवर मजबूत पकड आहे. मात्र, आता भारत चीनला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे.

दरम्यान, भारताने (India) याआधीच चीनमधील 300 हून अधिक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आता भारतात काही फोनवर बंदी येऊ शकते. किंबहुना, भारताला आपल्या ढासळत्या देशांतर्गत उद्योगाला चालना द्यायची आहे. यासाठी, 12,000 रुपये ($150) पेक्षा कमी किंमतीचे फोन विकण्यापासून चिनी स्मार्टफोन (Smartphone) निर्मात्यांना बंदी घालायची आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, भारत 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चिनी कंपन्यांच्या फोनवर बंदी घालू इच्छितो. असे झाल्यास Xiaomi Corp सह अनेक ब्रँडला मोठा धक्का बसेल.

स्वस्त चिनी मोबाईल फोनवर भारताला बंदी का घालायची आहे?

चीननंतर (China) भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल बाजार आहे. या प्रकरणाशी परिचित तज्ञांच्या म्हणण्यानुसार, 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चायनीज फोनवर बंदी घालण्याचे उद्दिष्ट म्हणजे चिनी दिग्गजांना भारतीय बाजारपेठेतून बाहेर काढणे. Realme आणि Transsion (Tecno, Itel आणि Infinix) सारखे चीनी ब्रँड भारतीय मोबाईल मार्केटमध्ये तळाशी आहेत.

चिनी बाजार ठप्प, भारतावर विश्वास

भारताच्या एंट्री-लेव्हल मार्केटमध्ये जर चिनी मोबाईल फोनवर बंदी घातली, तर Xiaomi सारख्या चिनी ब्रँडला मोठा फटका बसेल. वाढत्या कोरोना निर्बंधामुळे चीनची देशांतर्गत बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अनेक चिनी कंपन्यांची चौकशी सुरु

भारत आधीच देशात कार्यरत असलेल्या Xiaomi, Oppo आणि Vivo सारख्या चिनी कंपन्यांची चौकशी करत आहे. या कंपन्यांवर करचोरी आणि मनी लाँड्रिंगचे (Money Laundering) आरोप आहेत. Huawei Technologies Co आणि ZTE Corp दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्यासाठी सरकारने यापूर्वी अनधिकृत माध्यमांचा वापर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT