ISRO SSLV: इस्रोचे सर्वात लहान रॉकेट SSLV प्रक्षेपण अयशस्वी, उपग्रह कक्षेत पोहोचू शकला नाही

ISRO SSLV
ISRO SSLVDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज (7 ऑगस्ट 2022) देशातील नवीन रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (Small Satellite Launch Vehicle - SSLV) लॉन्च केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 1 वरून हे प्रक्षेपण करण्यात आले. पण प्रक्षेपण अयशस्वी ठरले असून, उपग्रह कक्षेत पोहोचू शकला नाही.

उपग्रह प्रक्षेपणाचे (SSLV) सर्व टप्पे सामान्य होते, पण ज्या कक्षेत उपग्रह पोहचवायचा होता तिथे तो पोहचला नाही. आता या उपग्रहाचा काही उपयोग होणार नाही. उपग्रह प्रक्षेपण अपयशी होण्याची कारणं शोधली जातील, आणि त्यावर तोडगा काढण्यात येईल. असे इस्रोने म्हटले आहे.

तसेच, लवकरच SSLV D-2 लॉन्च केले जाणार आहे. उपग्रहाच्या अपयशामागील कारणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, असे इस्रोने म्हटले आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, "SSLV-D1 ने सर्व टप्प्यांत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात काही डेटा समस्या आहेत. स्थिर कक्षा गाठण्यासाठी डेटा विश्लेषण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

SSLV

एसएसएलव्ही 34 मीटर लांब आहे, जो पीएसएलव्ही पेक्षा सुमारे 10 मीटर कमी आहे आणि पीएसएलव्हीच्या 2.8 मीटरच्या तुलनेत त्याचा व्यास दोन मीटर आहे. PSLV चे वजन 320 टन आहे, तर SSLV चे वजन 120 टन आहे. PSLV 1800 किलो वजनाचा पेलोड वाहून नेऊ शकतो. देशातील पहिले सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल 3, जे 1980 मध्ये प्रक्षेपित केले होते, ते 40 किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकते.

ISRO SSLV
Goa Rain Update: गोव्यासह कोकण किनारपट्टीवर येत्या 4 तासात मुसळधारेची शक्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com