Death Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: धक्कादायक! जेवण करताना पोटच्या तीन मुलांना खाऊ घातले विष; आई-बापाचाही जीवन संपविण्याचा प्रयत्न

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात आई - वडिलांनी पोटच्या तीन मुलांना विष खाऊ घालून स्वत: देखील जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

छत्तीसगड: कांकेर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आई – वडिलांनी पोटच्या तीन मुलांना विष खाऊ घातल्यानंतर स्वत: देखील जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. कांकेर जिल्ह्यात शनिवारी (१४ जून) हा प्रकार उघडकीस आला. तीन मुलांचा मृत्यू झाला असून, आई – वडिलांची तब्येत चिंताजनक आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, पराळकोट गावात देवेंद्र बैरागी (वय ७०) यांनी शुक्रवारी रात्रीच्या वेळेस जेवण करत असताना दोन मुली जुतिका बैरागी (९), दिप्ती (१२) आणि मुलगा देवराज (६) यांना विष खाऊ घातले. यात तीनही मुलांचा मृत्यू झाला. यानंतर देवेंद्र आणि त्याची पत्नी यांनी देखील विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. 

शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी देवेंद्र आणि त्याच्या पत्नीला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, पती – पत्नीची तब्येत अद्याप चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बैरागी दाम्पत्य आर्थिक संकटाचा सामना करत होते. याच विंवचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिस तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT