Chhaava Movie Release
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत 'छावा' चित्रपट अखेर आज (१४ फेब्रुवारीला) जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा हॉलबाहेर प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन संघर्षमय आणि शौर्याने भरलेले होते. मुघल सम्राट औरंगजेबाशी दिलेली लढाई, त्यांचे राजकीय धोरण, युद्धनीती आणि त्यांच्या धैर्याची गाथा या चित्रपटातून साकारण्यात आली आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये खूप दिवसांपासून होती. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जोरदार ओपनिंग घेतली आहे. अॅडव्हान्स बुकिंगचाही प्रतिसाद जबरदस्त होता, आणि आता प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'छावा' चित्रपटाला पाचपैकी साडेचार स्टार्स रेटिंग दिली आहे. आताच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेता म्हणून विकीने आपलं स्थान निश्चित केलंय. तर कथाकार म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरही यशस्वी ठरले आहेत,’ असं तरण आदर्श यांनी म्हटलंय.
'छावा' हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नाही, तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याचा भव्य आविष्कार आहे. हा चित्रपट जितका भव्यदिव्य आहे, तितकाच तो हृदयाला भिडणारा देखील आहे.
चित्रपटात विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाची सध्या जोरदार चर्चा आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना दिसून येते.रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, निलकांती पाटेकर, संतोष जुवेकरसह अनेक स्टार कलाकार या चित्रपटात आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे.
'छावा' हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, तो मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा जगासमोर मांडणारा एक महत्त्वाचा सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या चित्रपटाद्वारे केले जात आहे. ऐतिहासिक चित्रपटांची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.