Jharkhand Mob Lynching Dainik Gomantak
देश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Jharkhand Mob Lynching Case: झारखंडमधील चतरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या संशयावरुन जमावाने एका तरुणाची हत्या केली.

Manish Jadhav

Jharkhand Mob Lynching Case: झारखंडमधील चतरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या संशयावरुन जमावाने एका तरुणाची हत्या केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले. पीडित मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या तरुणावर ग्रामस्थांकडून करण्यात आला होता. मात्र, अद्याप या गंभीर आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.

याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली असून, कायद्याचा बडगा उचलण्याऐवजी जमावाने स्वतःच्या हातात कायदा घेतल्याचे उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 100 ते 150 लोकांचा एक हिंसक जमाव मृत तरुणाच्या घरावर चालून गेला. या जमावाने तरुणावर गावातील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने स्वतःच्या घरात डांबून ठेवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. जेव्हा तरुणाच्या पालकांनी या आरोपांचे खंडन केले, तेव्हा संतप्त जमावाने पालकांना बांधून ठेवून त्यांच्याशी अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी जेव्हा तो तरुण पुढे आला, तेव्हा जमावाने त्याच्यावर काठ्या आणि दगडांनी जीवघेणा हल्ला चढवला.

या संपूर्ण घटनेबाबत दाखल झालेल्या एफआयआरमध्ये मृत तरुणाच्या वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. घटनेच्या वेळी घटनास्थळी काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते, तरीही हा हिंसक प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला नंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. या प्रकरणात 56 जणांविरुद्ध नावाने तक्रार नोंदवण्यात आली असून, मारहाणीचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत 10 जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, गावातील एक मुलगी सोमवार रात्रीपासून बेपत्ता होती. मंगळवारी सकाळी ती सापडल्यानंतर तिने मृत तरुणाच्या घरात आपल्याला ओलीस ठेवल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतरच ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी तरुणाच्या घरावर हल्ला करुन ही मॉब लिंचिंगची घटना घडवली. सध्या पोलीस (Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA मध्ये 3 ते 4% वाढीचे संकेत, अधिकृत घोषणा कधी होणार? मोठी अपडेट समोर

Goa Politics: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? सत्ताधारी भाजपला देणार टक्कर

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: 'भाजपनं गोव्याला नशायुक्त राज्य बनवलं', काँग्रेसचा सावंत सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT