Farooq Abdullah  Dainik Gomantak
देश

Farooq Abdullah यांच्याविरुद्ध ED ने दाखल केली सप्लीमेंट्री चार्जशीट

Jammu And Kashmir: अंमलबजावणी संचालनालय ( ED) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

दैनिक गोमन्तक

JKCA Money Laundering: जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि इतर आरोपींविरुद्ध मंगळवारी सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय ( ED) या प्रकरणाची चौकशी करत आहे. विशेष न्यायालयाने सर्वांना 27 ऑगस्टला समन्स बजावले आहे.

दरम्यान, ईडीने (ED) दावा केला आहे की, जेकेसीएचे तत्कालीन पदाधिकारी एहसान अहमद मिर्झा यांच्यासह अन्य आरोपी सलीम खान (माजी सरचिटणीस), मीर मंजूर गझनफर, गुलजार अहमद (माजी लेखापाल जेकेसीए), बशीर अहमद मिसगर (जेके बँकेचे कार्यकारी) आणि डॉ. फारुक अब्दुल्ला आहेत. इतर आरोपींसोबत (Accused) जेकेसीएच्या खात्यातून 51.90 कोटी रुपये काढण्यात आले होते.

दुसरीकडे, विशेष न्यायालयाने फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) आणि इतर आरोपींना 27 ऑगस्टला समन्स बजावले आहे. याच प्रकरणी ईडीने फारुख अब्दुल्ला यांची 31 मे रोजी तीन तास चौकशी केली होती. सीबीआय आणि ईडी 2004 ते 2009 दरम्यान जेकेसीएमधील मनी लाँड्रिंगचा तपास करत आहेत.

तसेच, फारुख अब्दुल्ला 2001 ते 2012 पर्यंत JKCA चे अध्यक्ष होते. आतापर्यंतच्या तपासात फारुख अब्दुल्ला यांच्या 11.86 कोटींच्या स्थावर संपत्तीसह एकूण 21 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत.

त्याचबरोबर, ईडीने तपासादरम्यान खुलासा केला आहे की, 'एहसान अहमद मिर्झा यांनी जेकेसीएच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत संगनमताने 51.90 कोटी रुपये व्यावसायिक दायित्वे पूर्ण करण्यासाठी वापरले.'

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा यांनी जेकेसीएमधून पैसे काढून घेतले आणि ते अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्याकडे सुपूर्द केले. मिर्झा यांनी जेकेसीएच्या कार्यकारिणी आणि ऑडिटर यांच्याकडून व्यवहाराच्या नोंदी लपवल्या.

शिवाय, श्रीनगरमधील रामबाग मुन्शी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरु केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT