तालिबानने इस्लामिक धर्म पाळत राज्य करावे: फारुख अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) स्थापन झालेल्या तालिबान सरकारबाबत (Taliban Government) विधान केले आहे.
Farooq Abdullah: Taliban will deliver good governance following Islamic principles
Farooq Abdullah: Taliban will deliver good governance following Islamic principles Dainik Gomantak

जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) स्थापन झालेल्या तालिबान सरकारबाबत (Taliban Government) विधान केले आहे. फारुख अब्दुल्ला म्हणतात की त्यांना आशा आहे की तालिबान अफगाणिस्तानमध्ये चांगले प्रशासन देईल.(Farooq Abdullah: Taliban will deliver good governance following Islamic principles)

श्रीनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानने इस्लामिक नियमांच्या आधारे अफगाणिस्तानवर राज्य केले पाहिजे, जगातील सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, त्यांना आशा आहे की तालिबान प्रत्येकाला न्याय देईल.

दरम्यान आता फारुख अब्दुल्लांच्या या विधानावर भारतीय जनता पक्ष भडकला आहे. भाजप नेते आणि जम्मू -काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्लाबोल केला आहे. निर्मल सिंह म्हणतात की तालिबान महिला आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार करत आहे, पण फारूक अब्दुल्ला त्यांची बाजू घेत आहेत.

Farooq Abdullah: Taliban will deliver good governance following Islamic principles
Modi Government: तालिबानशी चर्चा करते परंतु देशातील बळीराजाशी का बोलत नाही, काँग्रेस चा सवाल

निर्मल सिंह म्हणाले की, फारुख अब्दुल्लांना फक्त त्या देशांमध्ये धर्मनिरपेक्षता हवी आहे जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. पण जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत, त्यांना इस्लामिक नियम हवे आहेत.

फारूक अब्दुल्लाच्या आधीही देशात तालिबान बद्दल वक्तव्यावर अनेकवेळा राजकारण झाले आहे. कवी मुनावर राणा, सपाचे खासदार शफीकुर रहमान बुरके यांनी तालिबानबद्दल दिलेल्या वक्तव्यावर देशात बराच गदारोळ झाला होता.

तालिबानबाबत भारताकडून अद्याप स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. भारत सातत्याने आपल्या मित्र राष्ट्रांशी चर्चा करत आहे आणि थांबा आणि पाहाचे धोरण स्वीकारत आहे. तथापि, एकदा तालिबानशी दोहामध्ये भारताच्या बाजूने अधिकृत चर्चा झाली. परंतु या बैठकीत अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यावरच भर होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com