मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फारुख अब्दुल्लांना ईडीने बजावले समन्स

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे.
 Farooq Abdullah
Farooq AbdullahDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना 31 मे रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळ्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. (ED issues summons to Farooq Abdullah in money laundering case)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) च्या माजी पदाधिकाऱ्यांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने डिसेंबर 2020 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. अब्दुल्ला 2001 ते 2012 पर्यंत JKCA चे अध्यक्ष होते. याशिवाय, अंमलबजावणी संचालनालयाने अहसान अहमद मिर्झाची 7.25 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता "तात्पुरती जप्त" केली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण

श्रीनगरमधील राममुन्शी बाग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे जेकेसीएच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरु करण्यात आला. नंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. 43.69 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने जेकेसीएच्या माजी पदाधिकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ची चौकशी 2004 ते 2009 दरम्यान कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com