Accused Dainik Gomantak
देश

Delhi: चायवाला बनला बनावट IPS, महिलांना करायचा टार्गेट; 50 हून अधिक...

Delhi Police: आयपीएस असल्याची बनावट ओळख दाखवून त्याने 50 हून अधिक लोकांना फसवले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्याचे लक्ष्य महिला होत्या.

दैनिक गोमन्तक

Chaiwala Became Fake IPS: आजच्या युगात एखाद्यावर सहज विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःला संकटात ढकलण्यासारखेच आहे. फसवणूक करणारे खोट्या ओळखींनी लोकांना फसवणुकीचे शिकार बनवत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये समोर आला आहे. ग्वाल्हेरचा रहिवासी असलेला आरोपी एकेकाळी चहा विकायचा. आयपीएस असल्याची बनावट ओळख दाखवून त्याने 50 हून अधिक लोकांना फसवले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, त्याचे लक्ष्य महिला होत्या.

आरोपी आठवीपर्यंतचा शिकला

आरोपी (Accused) गौतम उर्फ ​​विकास यादव हा मुखर्जी नगर परिसरात चहा विकायचा. मुखर्जी नगर हे नागरी सेवा इच्छूकांसाठी कोचिंग सेंटरचे केंद्र राहिले आहे. 30 वर्षीय आरोपी हा आठवीपर्यंत शिकलेला आहे. कमी शिक्षित असूनही, तो उत्तर दिल्ली प्रदेशातील महिला आणि नागरी सेवा उमेदवारांना फसवण्यात यशस्वी झाला.

अशा प्रकारे बनावट आयपीएस बनले

आरोपीने त्याचे बनावट सोशल मीडिया खाते तयार केले आणि 2020 बॅचचा आयपीएस अधिकारी (यूपी केडर) म्हणून ओळख सांगितली. रिपोर्ट्सनुसार, त्याने 50 हून अधिक लोकांकडून 14 लाखांहून अधिक रुपयांची वसुली केली.

डॉक्टरांच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक

विकासने त्याच्या बनावट ओळखीचा वापर करुन पैशाच्या बदल्यात विविध विभागात काम मिळवल्याचेही पोलिसांनी उघड केले आहे. पोलीस उपायुक्त (बाह्य) हरेंद्र के सिंह यांच्या म्हणण्यानुसार, संजय गांधी रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने 17 डिसेंबर रोजी विकासविरोधात तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली की, आयपीएस अधिकारी विकास यादव याच्या बनावट आयडी असलेल्या एका व्यक्तीने त्याच्याशी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मैत्री केली. संबंध दृढ केल्यानंतर विकासने महिलेला फोनपेद्वारे 25 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. आजारी आईच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने सांगितले होते.

आरोपी 2019 मध्ये दिल्लीत आला होता

विकास 2019 मध्ये दिल्लीत आला होता. त्याने मुखर्जी नगर येथील हॉटेलमध्ये काम केले. यादरम्यान आरोपी अनेक नागरी सेवा उमेदवारांच्या संपर्कात आला. त्यानंतर तो त्याच्या बनावट इन्स्टाग्राम प्रोफाईलद्वारे अनेक हाय प्रोफाईल व्यक्तींच्या संपर्कात आला. सध्या त्याचे बनावट इन्स्टाग्राम आयडीवर 19,700 फॉलोअर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT