Students Dainik Gomantak
देश

CBSE 10th Exam: खूशखबर! 2026 पासून दोन टप्प्यात होणार दहावीची परीक्षा, सीबीएसईचा मोठा निर्णय

CBSE Exam Pattern Change: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) पुढील वर्षी म्हणजेच 2026 पासून एका वर्षात दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा घेणार आहे.

Manish Jadhav

CBSE 10th Board 2026 Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) पुढील वर्षी म्हणजेच 2026 पासून एका वर्षात दोनदा दहावीची बोर्ड परीक्षा घेणार आहे. परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मेमध्ये होईल. पहिल्या टप्प्याचे निकाल एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्याचे निकाल जूनमध्ये येतील. मात्र अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असणार असून दुसरा टप्पा पर्यायी असेल.

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी याची पुष्टी केली. CBSE च्या नवीन नियमांनुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या बोर्ड परीक्षेत बसणे अनिवार्य असेल, तर दुसऱ्या परीक्षेत बसणे ऐच्छिक असेल.

या व्यवस्थेमागे सीबीएसईचा हेतू काय?

बोर्डाने स्पष्ट केले की, 'विद्यार्थी परीक्षेच्या एका किंवा दोन्ही टप्प्यांना बसले असले तरी अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल. या व्यवस्थेद्वारे सीबीएसईचा उद्देश विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे आहे. जेणेकरुन ते त्यांच्या तयारीनुसार चांगले प्रदर्शन करु शकतील. एवढचं नहीतर त्यांचा ताण देखील कमी होईल.'

वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा फायदा काय?

सीबीएसईच्या या निर्णयाबाबत तज्ञांचे मत आहे की, वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय हा एक मोठी शैक्षणिक सुधारणा आहे. यातील पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे परीक्षेचा ताण कमी होईल. विद्यार्थी वर्षातून दोनदा परीक्षा देऊन त्यांची तयारी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करु शकतात. मानसिक दबाव कमी होईल. यामुळे मानसिक आरोग्य सुधारेल.

यासोबतच, सुधारणेची संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याचा पहिला प्रयत्न चांगला झाला नाही, तर तो दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सुधारु शकतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची मानसिकता विकसित होईल. अनेक वेळा आजारपण, कौटुंबिक समस्या किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करु शकत नाहीत. दोन परीक्षांचा पर्याय असल्याने वाईट वेळेमुळे अशा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT