आपल्या देशात शालेय मुलांना लैंगिक शिक्षण देण्याचा विचार बऱ्याच काळापासून सुरु आहे. मुलांना लैंगिक शिक्षणाबद्दल शाळेत मनमोकळ्या पद्धतीने शिक्षकांनी शिकवले पाहिजे, जेणेकरुन या विषयासंबंधी त्यांचा बौद्धिक विकास योग्य वेळी होऊ शकेल. विशेष म्हणजे, हे त्यांना बाल लैंगिक शोषणाबाबत जागरुक करण्यात मदत करु शकते. किशोरावस्था हा वयाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो जेव्हा मुले सर्व प्रकारच्या विषयांमध्ये रस घेऊ लागतात. मग ते लैंगिक शिक्षण, डेटिंग, रोमान्स किंवा रिलेशनशिप यासारखे विषय असोत. किशोरावस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यासंबंधीच्या मुद्द्यांवर मुलांशी मोकळेपणाने चर्चा करावी, असे पालकांना अनेकदा सांगितले जाते. यातच आता, CBSE च्या इयत्ता 9 वी च्या पुस्तकात 'डेटिंग आणि रिलेशनशिप' हा धडा मूल्य शिक्षणातर्गंत शिकवला जात आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, X च्या @nashpateeee हँडलवर या धड्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. तुम्हाला फोटोत दिसेल की 'डेटिंग आणि रिलेशनशिप' या धड्याखाली लिहिले आहे की, स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणे. तसेच, त्याच्या खाली संदर्भासाठी एक ओळ लिहिली आहे ज्याचा अर्थ आहे - एक आदर्श संबंध दोन गोष्टींबद्दल आहे - प्रथम, समानतेचा सन्मान करणे आणि दुसरे, विभिन्नतेचा आदर करणे.
किशोरावस्थेत एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आपण एखाद्याला 'स्पेशल' कसे समजू लागतो हे उदाहरणांसह समजावून सांगण्याचा प्रयत्न या धड्यात करण्यात आला आहे. तसेच, घोस्टिंग, कॅटफिशिंग आणि सायबर बुलींग यांसारख्या शब्दांचा अर्थ पुढील पानावर स्पष्ट केला आहे.
दरम्यान, या फोटोवर नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक यूजर्संनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हा एनसीआरटीच्या पुस्तकातील धडा आहे का. एका व्यक्तीने लिहिले की- 'अप्रतिम! हे कोणत्या बोर्डाचे पुस्तक आहे? सीबीएसई, आयसीएसई किंवा स्टेट बोर्ड. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, पुढील प्रकरण ब्रेकअप आणि पॅचअपवर देखील असावे. हा धडा सीबीएसईच्या मूल्य शिक्षणाच्या पुस्तकात दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.