Goa HSC CBSE Result 2024: अनिश कांबळी राज्यात अव्वल; बारावी परिक्षेत मिळवले ९८.२० टक्के गुण

Goa HSC CBSE Result 2024: संस्थेमधून सर्वसमावेशक अभ्यास साहित्य आणि कठोर व सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने कमी कालावधीत विविध विषयांतील जटिल संकल्पना सुलभ व सहजपणे समजून घेण्यास आपण सक्षम झालो, असे त्याने सांगितले.
Goa HSC CBSE Result 2024
Goa HSC CBSE Result 2024Dainik Gomantak

Goa HSC CBSE Result 2024

पणजी, प्रवेश परिक्षांच्या पूर्वतयारी मार्गदर्शन सेवांमध्ये भारतात अग्रणी असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल-AESL) चा विद्यार्थी अनिश अरविंद कांबळी हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यात अव्वल आला आहे.

अनिश अरविंद कांबळीने ९८.२० टक्के (५०० पैकी ४९१) गुण मिळवून मिळवून प्रशंसनीय कामगिरी केली आहे. त्याने जीवशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये प्रत्येकी १०० गुण, मानसशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांत प्रियेही ९८ तर भौतिकशास्त्र विषयात ९५ गुण पटकावले आहेत.

आकाश इन्स्टिट्यूटमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या विविध कोर्स फॉरमॅटद्वारे सर्वसमावेशक आयआयटी-जेईई परिक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले जाते. गत काही वर्षांत, आकाशने संगणक-आधारित प्रशिक्षण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आकाशचे नावीन्यपूर्ण iTutor प्लॅटफॉर्म रेकॉर्ड केलेले व्हिडिओ व्याख्याने वितरित करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंनिर्धारित गतीने अध्ययन करणे सुलभ बनते.

Goa HSC CBSE Result 2024
Santa Cruz VP Goa: ऑलिव्हेरा सरपंचपदी कायम;अविश्‍वास ठराव बारगळला

तसेच अनुपस्थितीमुळे सुटलेल्या अभ्यासक्रमाचीही तयारी करण्यास सक्षम करते. त्याचबरोबर प्रत्यक्ष परिक्षा वातावरणाचा अनुभव देणाऱ्या मॉक टेस्टच्या माध्यमातून परिक्षेची तयारी करणे, परिक्षेच्या परिस्थितीचे अनुकरण करणे आणि प्रत्यक्ष परीक्षेला सहजतेने व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास विद्यार्थी सज्ज होतात, असे आकाशचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड यांनी सांगितले.

शिक्षकांकडून अमूल्य मार्गदर्शन : अनिश

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, अनिश याने त्याच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे नमूद केले. संस्थेमधून सर्वसमावेशक अभ्यास साहित्य आणि कठोर व सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने कमी कालावधीत विविध विषयांतील जटिल संकल्पना सुलभ व सहजपणे समजून घेण्यास आपण सक्षम झालो, असे त्याने सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा अभिमान : राठोड

आकाशचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करताना सांगितले की, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा खूप अभिमान आहे.

अनिशचे उल्लेखनीय यशाचे गमक म्हणजे आमच्या संस्थेचा ध्यास, आमच्या अभ्यासक्रमाची परिणामकारकता आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या उत्कृष्टतेच्या प्रवासासाठी आम्ही जपलेली बांधिलकी होय, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com