CBSE Board 12th And 10th Result 2023 Dainik Gomantak
देश

CBSE Board 12th And 10th Result 2023: दहावीचे 93.12 तर, बारावीचे 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, येथे पाहा तुमचा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

CBSE Board 12th And 10th Result 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शिक्षण मंडळाने (CBSE) नुकतेच निकालाबाबत एक परिपत्रक जारी केले होते. दहावीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, बारावीच्या परीक्षेत एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावी

बारावीत उत्तीर्ण झालेल्या 87.33 टक्के विद्यार्थ्यांपैकी, 90.68 टक्के मुली आणि 84.67 टक्के मुले आहेत.

त्रिवेंद्रम 99.91 टक्के उत्तीर्णतेसह अव्वल आहे. बंगळुरू 98.64 टक्क्यांसह दुसऱ्या, चेन्नई 97.40 टक्क्यांसह तिसऱ्या, दिल्ली पश्चिम 93.24 टक्क्यांसह चौथ्या आणि 91.88 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.

दहावी

CBSE 10वी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाला आहे. या वर्षी दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.12 टक्के इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.

दहावीच्या निकालानंतरही बोर्ड टॉपर्सची घोषणा करणार नाही. अनावश्यक स्पर्धा संपवण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन मार्कशीट डाउनलोड करू शकतात.

अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठी निकालात 3 मोठे बदल

- निकालासोबत विद्यार्थ्यांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीची माहिती देणार नाही.

- गुणवत्ता यादी देखील जारी केली जाणार नाही.

- विषयनिहाय अव्वल 0.1 टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाईल.

येथे पाहा तुमचा निकाल

cbse.gov.in
results.nic.in
results.digilocker.gov.in
umang.gov.in

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT