Case Against Rolls Royce 
देश

Case Against Rolls Royce: हॉक विमान खरेदी प्रकरण! CBI ने रोल्स रॉयस विरोधात दाखल केला गुन्हा

हॉक एअरक्राफ्टच्या खरेदीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ब्रिटीश एरोस्पेस कंपनी रोल्स रॉयस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि संबधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pramod Yadav

Case Against Rolls Royce: हॉक एअरक्राफ्टच्या खरेदीप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ब्रिटीश एरोस्पेस कंपनी रोल्स रॉयस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि संबधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

CBI ने ब्रिटीश एरोस्पेस कंपनी रोल्स रॉयस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रोल्स रॉयस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर टीम जोन्स, सुधीर चौधरी आणि भानू चौधरी आणि इतर अज्ञात सरकारी कर्मचारी आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

सीबीआय कंपनीशी संबंधित या लोकांची लवकरच नोटीस बजावून चौकशी करू शकते. अशी माहिती समोर आली आहे.

ब्रिटिश एरोस्पेस कंपनी रोल्स रॉइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि संचालक टीम जोन्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय सुधीर चौधरी, भानू चौधरी यांच्यासह अन्य अनोळखी सरकारी कर्मचारी आणि खासगी व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सीबीआयने म्हटले आहे.

हॉक एडवान्स जेट ट्रेनर विमान खरेदी प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.

अज्ञात अधिकार्‍यांनी पदांचा गैरवापर केला आणि मेसर्स हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 42 अतिरिक्त विमाने तयार करण्याची परवानगी दिली. तसेच ₹734.21 दशलक्ष रूपयांत त्यांनी एकूण 24 हॉक 115 प्रगत जेट ट्रेनर (AJT) विमाने खरेदी केली. असे सीबीआयने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT