CBI Dainik Gomantak
देश

चूक की घोटाळा? ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 820 कोटी; गूढ उकलण्यासाठी CBI ची 67 ठिकाणी छापेमारी

UCO Bank: यूको बँकेतील 820 कोटी रुपयांच्या IMPS घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये 67 ठिकाणी छापेमारी केली.

Manish Jadhav

IMPS Scam Case:

यूको बँकेतील 820 कोटी रुपयांच्या IMPS घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये 67 ठिकाणी छापेमारी केली. यूको बँकेकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा गुन्हा दाखल केला होता.

गेल्या वर्षी 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान यूको बँकेच्या 41,000 खातेदारांच्या खात्यात अचानक 820 कोटी रुपये जमा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, एकीकडे ही रक्कम खात्यांमध्ये जमा होत असताना, दुसरीकडे ज्या खात्यांमधून ही रक्कम मूळत: हस्तांतरित करण्यात आली होती, त्या खात्यातून डेबिट झाल्याची नोंद नाही.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की या संदर्भात छाप्याचा भाग म्हणून कोलकाता (Kolkata) आणि मंगलोरसह अनेक शहरांमध्ये पहिल्यांदा 13 परिसरांवर छापे टाकण्यात आले. रिपोर्टनुसार, केवळ तीन दिवसांत, IMPS द्वारे 8.53 लाखांहून अधिक व्यवहार केले गेले, ज्यामध्ये 820 कोटी रुपये खाजगी बँकांच्या 14,000 खातेधारकांना आणि UCO बँक खातेधारकांच्या 41,000 खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ बँक खात्यातून कोणतीही रक्कम डेबिट झाली नाही आणि अनेक खातेदारांनी त्यांच्या खात्यातील रक्कम अचानक काढून घेतली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूको बँकेच्या तक्रारीवरुन बँकेत काम करणारे दोन सहाय्यक अभियंते आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, छापेमारीदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, कंप्यूटर सिस्टम, ईमेल आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले.

गेल्या वर्षीची ही घटना आहे

सीबीआयच्या (CBI) म्हणण्यानुसार, "असा आरोप आहे की 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान, सात खाजगी बँकांच्या 14,000 खातेदारांकडून IMPS व्यवहारांशी संबंधित निधी IMPS चॅनलद्वारे UCO बँकेच्या 41,000 खातेधारकांच्या खात्यात पोहोचला." सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या

माहितीनुसार, "या जटिल नेटवर्कमध्ये 8,53,049 व्यवहारांचा समावेश असल्याचा आरोप आहे आणि हे व्यवहार UCO बँकेच्या खातेदारांच्या नोंदींमध्ये चुकीच्या पद्धतीने नोंदवले गेले आहेत, तर मूळ बँकांनी व्यवहार अयशस्वी म्हणून नोंदवले आहेत."

दुसरीकडे, या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक खातेदारांनी यूको बँकेतून विविध बँकिंग माध्यमातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवींचा आशयघन विनोद

Valpoi: विद्यार्थ्यांनी घेतला 'कृषी'चा प्रत्यक्ष अनुभव, युनिटी हायस्कूलचा बिबे-धावे-सत्तरीत शैक्षणिक अभ्यास दौरा

Mopa Airport: 'मोपा'वर 11 दारू आउटलेट्स कार्यरत, 80% व्यवसाय गोव्याबाहेरील कंपन्यांच्या ताब्यात

Ind Vs Eng: 'सर जडेजा'च्या नावावर मोठा विक्रम! गॅरी सोबर्सना टाकले मागे; 'हा' रेकॉर्ड करणारा बनला पहिलाच खेळाडू

Shigao: शिगावच्या देवस्थानात चोरीचा प्रयत्न फसला, पोलिस पेट्रोलिंग व्हॅन पाहून चोरांनी जंगलात धूम ठोकली

SCROLL FOR NEXT