आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक प्रकरणी CBI ची 11 राज्यांमध्ये छापेमारी; ऑपरेशन चक्र अंतर्गत...

CBI Operation Chakra: ऑपरेशन चक्र 2 केंद्रीय तपास एजन्सी म्हणजेच CBI राबवत आहे. याअंतर्गत सीबीआयने गुरुवारी देशातील विविध राज्यांमध्ये छापे टाकले.
CBI
CBIDainik Gomantak

CBI Operation Chakra: ऑपरेशन चक्र 2 केंद्रीय तपास एजन्सी म्हणजेच CBI राबवत आहे. या अंतर्गत सीबीआयने गुरुवारी देशातील विविध राज्यांमध्ये छापेमारी केली.

ऑपरेशन चक्र 2 अंतर्गत, सीबीआयने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील 76 ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, आंतरराष्‍ट्रीय सायबर फसवणुकीच्‍या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात सीबीआयने डिजिटल पुरावा म्हणून लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे.

CBI
CBI: नकली पासपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; लाखोंची लाच घेताना अधिकारी रंगेहात सापडला

दुसरीकडे, या छापेमारीत 48 लॅपटॉप, 32 मोबाईल फोन, दोन सर्व्हर, 33 सिमकार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने (CBI) सांगितले. या काळात सीबीआयने अनेक बँक खातीही गोठवली आहेत.

तसेच, सीबीआयने त्यांच्या माहितीसह 15 ईमेल खाती जप्त केली आहेत. यावरुन आरोपींचा कटही उघड झाला आहे, ज्याद्वारे ते लोकांची फसवणूक करण्याचे काम करतात.

तसेच, ऑपरेशन चक्र 2 अंतर्गत आंतरराष्ट्रीय टेक स्पोर्ट्स फसवणूक घोटाळ्याची दोन प्रकरणे समोर आली आहेत. आरोपी कॉल सेंटर चालवत होते, ज्याद्वारे परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com