A. Raja And CBI  Dainik Gomantak
देश

Charge sheet Against A Raja: बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी 'राजा' यांच्याविरोधात आरोपपत्र

सीबीआयची कारवाई; नातेवाईकाच्या कंपनीला रियल इस्टेट कंपनीकडून 4.56 कोटी रूपयांचे पेमेंट

गोमन्तक डिजिटल टीम

CBI Files Charge sheet Against A Raja: द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय दुरसंचार मंत्री ए. राजा यांच्याविरोधात सीबीआयने बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. ए. राजा यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या कार्यकाळातील 5.53 कोटी रूपयांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

चेन्नईतील विशेष सीबीआय न्यायालयात हे आऱोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपत्रात म्हटले आहे की, राजा यांचे जवळचे सहकारी सी. कृष्णमुर्ती यांनी कोवाई शेल्टर्स प्रमोटर्स ही कंपनी जानेवारी 2007 मध्ये सुरू केली होती. कंपनीला त्याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात 4.56 कोटी रूपयांचे पेमेंट गुरूग्राममधील एका रियल इस्टेट कंपनीकडून मिळाले होते.

त्या कंपनीने कांचीपुरम येथील जमिन खरेदीप्रकरणी हे कमिशन दिले होते. हे पेमेंट जमिनीच्या करारासाठी नव्हते. पण, कंपनीला रियल इस्टेट कंपनी म्हणून मान्यतेसाठी तत्कालीन मंत्री राजा यांना हे पेमेंट दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहेत. कंपनीने रियल इस्टेट क्षेत्रात कोणताही व्यवहार केलेला नाही, कालांतराने कंपनीने कोयम्बतूर येथे शेतीसाठीची जमिन खरेदी केली होती.

सीबीआयने आरोप केला आहे की, हे 4.56 कोटी रूपयांचे पेमेंट धरून एकूण 5.53 कोटी रूपये राजा यांचे जवळचे नातेवाईक संचालक असलेल्या कंपन्यांना दिले गेले होते. ही संपत्ती बेहिशोबी असून राजा यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा ५७९ टक्क्यांनी जास्त आहे.

सीबीआयने या प्रकरणी राजा यांच्यासह इथर 16 जणांविरोधात 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता. यात राजा यांचा पुतण्या परमेश, पत्नी परामेश्वरी, राजा यांचे सहकारी कृष्णामुर्ती यांचा समावेश आहे. पैकी कृष्णमुर्ती हे कोवाई शेल्टर्स प्रा. लि. चे संचालक आहेत.

कथित २ जी स्पेक्ट्रम वितरण घोटाळ्यात ए. राजा यांना राजीनामा द्यावा लागला होता. तथापि, त्यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होऊ शकले नव्हते, त्यामुळे विशेष कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT