CBI  Dainik Gomantak
देश

दिल्ली दारु घोटाळ्यात नवा ट्विस्ट, CBI ने ईडी अधिकाऱ्याला केली अटक!

Delhi Excise Policy Scam: सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहाय्यक संचालक पवन खत्री आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

Manish Jadhav

Delhi Excise Policy Scam: दिल्लीच्या कथित दारु घोटाळ्यातील आरोपी अमन ढल यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहाय्यक संचालक पवन खत्री आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

ईडीचा हा अधिकारी उच्चपदस्थ क्लार्क आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या इतर आरोपींमध्ये ब्रिंडको सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक अमन ढल, क्लेरिज हॉटेल्सचे सीईओ विक्रमादित्य, चार्टर्ड अकाउंटंट आणि एअर इंडियाचा कर्मचारी यांचा समावेश आहे.

दरम्यान, हे प्रकरण पाच कोटी रुपयांच्या लाचेशी संबंधित आहे. ईडीने जुलैमध्ये सहाय्यक संचालक पवन खत्री आणि इतर आरोपींवर छापे टाकून 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त लाचेची रक्कम जप्त केली होती.

सविस्तर चौकशीनंतर ईडीने या महिन्याच्या सुरुवातीला हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवले होते. सीबीआयने 25 ऑगस्ट रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

दुसरीकडे, अमन ढल यांच्याव्यतिरिक्त, सीबीआयने दाखल केलेल्या पहिल्या अहवालात पवन खत्री, ईडीचे यूडीसी नितेश कोहर आणि विक्रमादित्य, एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान आणि चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स यांची नावे आहेत.

प्रवीणकुमार वत्स यांच्यावर सूत्रधार म्हणून काम केल्याचा आरोप आहे. यासोबतच अमन ढल यांचे वडील बिरेंद्र पाल सिंह यांचे नावही सीबीआयच्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये समाविष्ट आहे.

तसेच, मार्चच्या पहिल्या आठवड्यात ईडीने अमन ढल यांना अटक केली होती. एफआयआरनुसार, एअर इंडियामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून काम करणार्‍या सांगवान यांनी वत्स यांना आश्वासन दिले होते की, काही पैशांच्या बदल्यात ईडीच्या दारु घोटाळ्याच्या प्रकरणात अटक होण्यापासून वाचवण्यासाठी ते ढल यांच्या मदतीची व्यवस्था करु शकतात.

सांगवान यांनी डिसेंबर 2022 मध्ये वत्स यांच्याशी खत्री यांची भेट घडवून आणली होती. सांगवान यांच्या विश्वासावर सूत्रधार वत्स यांनी ढल यांच्याकडून प्रत्येकी 50 लाख रुपये सहा हप्त्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत एकूण तीन कोटी रुपये घेतले होते.

त्यानंतर सांगवान यांनी दोन कोटी रुपयांच्या अतिरिक्त रकमेची व्यवस्था केल्यास या खटल्यातील आरोपींच्या यादीतून ढल यांना वगळले जाऊ शकते, अशी मोठी ऑफर दिली होती. सीबीआयने दाखल केलेल्या अहवालात चार हप्त्यांमध्ये दोन कोटी रुपये घेतल्याचे म्हटले आहे.

1 मार्च रोजी ईडीने ढल यांना अटक केली तेव्हा वत्स यांनी सांगवान यांना बोलावले होते. दोघांनी 3 मार्च रोजी दिल्लीतील प्रिया कॉम्प्लेक्समध्ये भेटायचं ठरवलं होतं.

सांगवान यांनी वत्स यांना यावेळी सांगितले की, अमन ढल यांच्या अटकेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आल्या आहेत.

त्यानंतर जूनमध्ये त्यांच्यात बोलणे झाले आणि त्यात लाचेची रक्कम परत करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. या बैठकांमध्ये पवन खत्री आणि नितेश कोहर हेही उपस्थित होते. 29 जून रोजी ढल यांच्या वडिलांना 1 कोटी रुपये परत करण्यात आले.

विक्रमादित्य यांच्या भूमिकेबाबत, ईडीच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, ढल यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर त्यांनी वत्स यांना मदत करण्यास सांगितले होते. एजन्सीने आरोपींमधील बैठकांचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले.

याशिवाय, वत्स यांच्या घरातून लाचेच्या रकमेपैकी 2.19 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सांगवान यांच्या घरातून दारु घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित कागदपत्रेही सापडली आहेत.

यापूर्वी, CBI ने गेल्या आठवड्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना भ्रष्टाचाराच्या चौकशीत अटक केली होती. विजय नायर यांनी AAP नेत्यांच्या वतीने साऊथ ग्रुपकडून 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दिल्ली सरकारचे उत्पादन शुल्क धोरण 2021-22 हे विक्री-खंड-आधारित प्रणाली व्यापाऱ्यांसाठी परवाना शुल्कासह बदलण्याच्या उद्देशाने आणले गेले. तथापि, जेव्हा एलजीने कथित अनियमिततेच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली तेव्हा ते धोरण स्थगित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT