Manish Sisodia Delhi Excise Case: मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ!

Manish Sisodia: दारु घोटाळ्यातील आरोपी मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून दणका बसला आहे.
Manish Sisodia
Manish Sisodia Dainik Gomantak
Published on
Updated on

Manish Sisodia Delhi Excise Case: दारु घोटाळ्यातील आरोपी मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा न्यायालयाकडून दणका बसला आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी वाढणार की संपणार? त्यावर आज न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे.

खरे तर, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपली होती, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यूज एजन्सी एएनआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहोचल्याचे दिसत आहेत.

दारु घोटाळ्याशी संबंधित सीबीआय आणि ईडी खटल्यातील त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

Manish Sisodia
Manish Sisodia यांना मोठा झटका, विशेष CBI न्यायालयाने जामीन फेटाळला; हायकोर्टात मागणार दाद

दरम्यान, अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अखेर दिलासा मिळाला नाही. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे.

ईडीशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यानंतर आज राऊस एव्हेन्यू कोर्टाने सीबीआय प्रकरणात सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 27 एप्रिलपर्यंत वाढवली आहे, तर ईडी प्रकरणात सिसोदिया यांच्या कोठडीत 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

यासोबतच, अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने तिथे उपस्थित असलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तपास यंत्रणा या महिन्याच्या अखेरीस आरोपपत्र दाखल करेल.

दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांच्यासोबत अबकारी घोटाळ्यातील आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यातील अरुण पिल्लई आणि अमनदीप ढल यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस अव्हेन्यू कोर्टाने 29 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

Manish Sisodia
Manish Sisodia: दिलासा नाहीच, मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

18 एप्रिल रोजी जामिनावर सुनावणी

मनीष सिसोदिया यांच्यासाठी उद्या म्हणजेच 18 एप्रिल हा देखील खास दिवस आहे. याच दिवशी दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या जामीन अर्जावरही महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

दारु घोटाळ्यात आज कोर्टाकडून दणका दिल्यानंतर सिसोदिया यांना उद्या जामीन मिळण्याची आशा आहे.

मनीष सिसोदिया यांना कधी ताब्यात घेण्यात आले?

मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील कथित अबकारी धोरण प्रकरणी ताब्यात घेतले होते. सिसोदिया यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत.

सिसोदिया यांना भेडसावणाऱ्या अडचणींपैकी एक म्हणजे अंमलबजावणी संचालनालयानेही त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. याच मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा तपास करुन सिसोदिया यांना अटक केली.

Manish Sisodia
Manish Sisodia: दिलासा नाहीच, ईडीने आवळला फास; मनीष सिसोदिया यांना कोर्टाचा दुहेरी झटका

तसेच, मनीष सिसोदिया यांना ईडी आणि सीबीआयला दिलेली कोठडी आज संपली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

3 एप्रिलला कोर्टाने सिसोदिया यांना 17 एप्रिलपर्यंत सीबीआय आणि 5 एप्रिलला ईडीला 17 एप्रिलपर्यंत कोठडी दिली होती.

त्याचबरोबर, दारु घोटाळाप्रकरणी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याही अडचणी वाढू शकतात. खरे तर, रविवारी सीबीआयने अरविंद केजरीवाल यांची जवळपास 9 तास चौकशी केली होती.

केजरीवाल यांनी स्वतः सांगितले की, सीबीआयने (CBI) त्यांना 56 प्रश्न विचारले होते आणि उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com