World Youth Skills Day Dainik gomantak
देश

World Youth Skills Day: कौशल्‍यपूर्ण शिक्षणाद्वारे करिअरच्या संधी

दैनिक गोमन्तक

पणजी : आज जगभरात युवा कौशल्यदिन (World Youth Skills Day) साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोमन्तक’शी बोलताना राज्याच्या (Goa) कौशल्य विकास खात्याचे संचालक दीपक देसाई (Deepak Desai) यांनी कौशल्य विकसित (Skills Development) करणारे शिक्षण हेच युवा पिढीसाठी भविष्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यादृष्टीने युवकांनी ‘आयटीआय’ (ITI) सारख्या केंद्रांत उपलब्ध केले जाणारे अभ्यासक्रम चोखाळून पाहावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Career opportunities will be available through skillful education)

सध्याचे युग हे डिजिटलायझेशनप्रमाणे कौशल्याचे युग असून तेच युवकांचे भविष्य आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे पदवी शिक्षण घेण्याऐवजी कौशल्यावर आधारित व कौशल्य विकसित करणारे शिक्षण घेण्यावर युवा पिढीने भर द्यायला हवा, असे सांगून देसाई यांनी नव्या शैक्षणिक धोरणातही कौशल्यावर आधारित शिक्षणावर जास्त भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी ‘स्किल इंडिया’च्या खाली अनेक योजना घोषित केल्या आहेत, याकडे लक्ष वेधले.

दहा आयटीआयद्वारे 38 अभ्‍यासक्रम

राज्यात दहा आयटीआय केंद्रे असून त्यातून 37 ते 38 प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. हे अभ्यासक्रम एक वा दोन वर्षांचे असतात. सध्या आठवी, नववी व दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या केंद्रांत प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावे, असे आवाहन देसाई यांनी केले. ‘आयटीआय’ केंद्रांमधील प्रवेशप्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्याने रोजगार प्राप्त होऊ शकतो तसेच स्वयंरोजगाराचा मार्गही चोखाळता येतो, हे त्यांनी नजरेस आणून दिले.

आत्‍मनिर्भर बना

प्रमाणपत्रासाठी शिक्षण न घेता प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी करून त्याद्वारे रोजगार मिळेल व स्वयंरोजगारही सुरू करता येईल, असे शिक्षण घ्यायला हवे. अद्ययावत शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. आज राज्यात इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर आदींची उणीव भासत असून परप्रांतांतील लोकांवर आम्हाला अवलंबून राहावे लागत आहे. आज घराघरांत विविध उपकरणे असून लहानसहान कामासाठी इलेक्ट्रिशियन, प्लंबर आदी तंत्रज्ञांची गरज भासत असते. पण, ते उपलब्ध होत नाहीत, याकडे संचालक देसाई यांनी लक्ष वेधले. ‘आयटीआय’ शिक्षण पूर्ण केलेल्यांना ॲप्रेंटिस म्हणून घेण्यासाठी अनेक कंपन्या संपर्क साधत असतात, ते त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे पदवी शिक्षण घेऊन बेकार राहण्यापेक्षा किंवा सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत राहण्यापेक्षा गोमंतकीय युवकांनी ही संधी घ्यायला हवी, असेही श्री. देसाई म्‍हणाले.

महिला उद्योजकतेला चालना देणार

कौशल्य विकास खात्याकडून आयटीआय केंद्रांबरोबर पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी हाताळली जाते. तसेच ‘संकल्प’सारख्या विविध योजना राबविल्या जातात. याशिवाय महिलांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यावरही भर देण्यात येत असून त्यादृष्टीने जागृती घडविण्यासाठी आणि महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविले जाणार आहेत. कोरोनामुळे हे कार्यक्रम लांबणीवर पडत आलेले आहेत.

- दीपक देसाई, संचालक, कौशल्य विकास खाते.

-अंकिता गोसावी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: ‘आमका नाका सनबर्न’! गावपण टिकवण्यासाठी कामुर्लीत स्थानिक एकवटले

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

Goa Eco Sensitive Zone बाबत 'सरकारचे' म्हणणे पोचण्याआधी 'ग्रामस्थांची निवेदने' दिल्लीत पोचली; पैंगीण, लोलयेचे जैवविविधतेला प्राधान्य

Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

SCROLL FOR NEXT