Sanguem: विकासाची पाटी कोरीच!

सांगे (Sanguem) मतदारसंघ हा पूर्वीपासूनच ग्रामीण भागात विखुरलेला समस्यांग्रस्त आणि दुर्लक्षित भाग.
Sanguem डिजिटलायझेशनला नेटवर्कचे विघ्‍न
Sanguem डिजिटलायझेशनला नेटवर्कचे विघ्‍नDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे : सांगे (Sanguem) मतदारसंघ हा पूर्वीपासूनच ग्रामीण भागात विखुरलेला समस्यांग्रस्त आणि दुर्लक्षित भाग. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. या मतदारसंघाला गृहित धरण्यात येते. राजकीय इतिहासात सर्वाधिक अन्याय कोणत्या मतदारसंघावर झाला असेल, तर तो सांगेवरच. मुक्त गोव्याच्या राजकीय सत्तास्थापनेत आत्ताच्या सांगे मतदारसंघातील काही भाग वगळता टोनी फर्नांडिस यांना मंत्री होण्याची संधी लाभली. त्यानंतर पांडू वासू नाईक यांनी बंडखोरी करून सत्ताबदल घडवीत अल्प काळासाठी वनमंत्री म्हणून काम केले. असा थोडा कालावधी वगळल्यास आजपर्यंतच्या साठ वर्षांत सांगेच्या राजकीय नशिबात विजनवास आला आहे. विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळात अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना मंत्री होण्याची नामी संधी आली होती, पण त्यांना संधीचे सोने करता आले नसल्याने मतदारसंघाची पाटी कोरीच राहिली. (When will Sanguem develop)

डिजिटलायझेशनला नेटवर्कचे विघ्‍न

संपूर्ण व्यवहार आता डिजिटल होत असताना या मतदारसंघाला मात्र वंचित राहावे लागते. अधिकतर भागात ना टेलिफोन ना मोबाईलला रेंज. मग घरी बसून काम आणि ऑनलाईन शिक्षणाचे धडे कसे गिरविले जाणार? खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर सांगेतील रोजगार बुडाला. बाजार ओसरला, बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला. खनिज वाहतूक करणारे ट्रक जागच्या जागी गंजून गेले. अशा परिस्थितीत मतदारसंघात एकमेव आशेचा किरण म्हणजे कृषी उत्पादन आणि पर्यटन विकास. पण या क्षेत्रातही दुर्लक्षच झाले आहे. मतदारसंघात किमान सातशे शेतकरी ऊस उत्पादन करीत होते ते आता संजीवनी साखर कारखाना बंद पडल्यामुळे हवालदिल झाले आहेत. नेत्रावळी, वाडे कुर्डी, भाटी, रिवण, मळकर्णे, कावरे पिर्ला या भागात दुधाचे उत्पादन तिपटीते होऊ शकते. त्यासाठी वातावरण पोषक असले तरी मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात नसल्याने या व्यवसायाला मंदी येऊ लागली आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष घातल्यास हा मतदारसंघ ‘कृषी हब’ म्हणून विकसित होऊ शकतो. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देत पशुचिकित्सक, साधनसुविधा दिल्यास दूधक्रांती शक्य आहे.

Sanguem डिजिटलायझेशनला नेटवर्कचे विघ्‍न
Goa: ‘स्मार्टनेस’ हरवून बसलीय पणजी!

क्षेत्रफळाने मोठा ग्रामीण भाग

हा मतदारसंघ क्षेत्रफळाने सर्वांत मोठा. सात ग्रामपंचायती, एक नगरपालिका मिळून मतदारसंघ. किमान साठ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर मतदारसंघाची फेरी पूर्ण होते. अधिकतर ग्रामीण आणि डोंगराळ भाग. सांगेहून राजधानी पणजी साठ किलोमीटर, तर फळणे मिराबाग येथून साळजिणी हा सांगे मतदारसंघाचा भागही साठ किलोमीटर अंतराचा आहे. या मतदारसंघाचा कोणत्याही दृष्टीने विकास झालेला नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल साळावली धरणाच्या पाण्यापासून मिळतो. खनिज उत्खननातूनही कोट्यवधींचा महसूल या भागातून मिळायचा. अजूनही दूध, काजू, नारळ, सुपारी व अन्य कृषी उत्पादनात अग्रेसर आहे. सर्वाधिक ऊस उत्पादनही सांगेतच होत आहे.

Sanguem डिजिटलायझेशनला नेटवर्कचे विघ्‍न
Goa: नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांची फरफट!

सांगेचा विकास न होण्यासाठी राजकीय प्रवृत्ती जबाबदार आहे. साठ वर्षांत थोडे थोडे काम झाले असते तरी चित्र बदलून गेले असते. सरकारने निधीचे वाटप समान करायला हवे. नोकऱ्या समान पद्धतीने देणे गरजेचे आहे. नवीन विकास प्रकल्पासाठी अशा ग्रामीण भागाचा विचार करावा.

"आजपर्यंत सांगेचा विकास झाला नाही. मामलेदार कॉम्प्लेक्स, हायरसेकंडरी, शासकीय क्रीडामैदान पांडू वासू नाईक यांच्या कालावधीत पूर्ण झाले. त्यानंतर कोणीही फारसा विकास केला नाही. ‘विकास’ हा शब्द शोधावा लागेल, अशी स्थिती आहे. भविष्यात मतदारसंघाचा उत्कर्ष होऊ दे."

- रुपेश रत्नाकर नाईक, बॅंक मॅनेजर

"राज्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत सांगे मतदारसंघ बराच मागे राहिला आहे. यात जनतेचा काहीच दोष नाही. विकासकामे करण्यासाठी साठ वर्षांत लोकप्रतिनिधींमध्ये तळमळ दिसली नाही. साधनसुविधा उपलब्ध केल्या म्हणजे विकास झाला असे होणार नाही, तर जनतेचा सामाजिक, आर्थिक दृष्टीने विकास झाला पाहिजे."

- विठ्ठल गावकर, नेत्रावळी

"भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर सांगेचा विकास हवा त्या प्रमाणात झाला नाही. जनतेचा विकास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सारे काही बदलले म्हणता येईल. मतदारसंघाला मंत्रिपद मिळायला हवे. आता मंत्री हे राज्याचे नसून मतदारसंघांचे असल्याप्रमाणे वागतात आहे. याचा फटका जनतेला बसत आहे."

- श्रीधर करमली, निवृत्त शिक्षक.

-मनोदय फडते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com