Infosys देणार 35,000 पदवीधरांना नोकरीची संधी

Infosys ने करिअरच्या संधी, पगार आणि कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक बाबी सुरू केल्या आहेत.
Infosys
InfosysDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात महाविद्यालयीन पदवीधरांसाठी रोजगाराच्या संबधीत एक चांगली बातमी आहे. प्रत्यक्षात, देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण राव यांनी म्हटले आहे की, टेक कंपनी 2021-22 (FY 22) आर्थिक वर्षात 35,000 महाविद्यालयीन पदवीधरांची नियुक्ती करणार आहे. इन्फोसिसने बुधवारी जूनच्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 22.7 टक्क्यांनी वाढून 5195 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षातील याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4233 कोटी रुपये होता. (Infosys will Hire 35,000 College Graduate students in 2022 year)

जून तिमाहीत इन्फोसिसचा ड्रॉपआउट दर 13 टक्के होता

इन्फोसिसचे सीओओ राव म्हणाले की, अलिकडच्या काळात डिजिटल टॅलेन्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आयटी क्षेत्रात नवीन कलागुणांची मागणी वाढत गेल्यानंतर काही काळानंतर हे उद्योग क्षेत्रातले मोठे आव्हान असते. म्हणूनच, जागतिक स्तरावर वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही वित्तीय वर्ष 2022 साठी 35,000 महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करण्याचे नियोजन केले आहे. जून तिमाहीत इन्फोसिसमध्ये नोकरी सोडणार्‍या लोकांची संख्या 13.9 टक्के झाली आहे. मार्च 2021 च्या तिमाहीत हा दर 10.9 टक्के होता. जो गेल्या वर्षीच्या जूनच्या तिमाहीत तुलनेत कमी आहे.

Infosys
BSF Recruitment 2021: 285 जागेसाठी असा करा अर्ज

इन्फोसिसमध्ये करिअरच्या संधी

सीईओ राव म्हणाले की, आम्ही करिअरच्या संधी, पगाराचा आढावा आणि कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक बाबी सुरू केल्या आहेत. इन्फोसिस देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. बुधवार, 14 जुलै रोजी जून तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. तिमाही आधारावर मार्च 2021 च्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा 5078 कोटी रुपये होता. कंपनीचे एकत्रित उत्पन्न वार्षिक आधारावर 18 टक्क्यांनी वाढून 28,986 कोटी रुपयांवर गेले आहे. एका वर्षापूर्वी ते 23,665 कोटी रुपये होते. तिमाही आधारावर ही वाढ 26,311 कोटी रुपयांवरून 6 टक्क्यांनी वाढून 27,896 कोटी रुपये झाली आहे.

Infosys
Navy Recruitment 2021: 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात भरती

कॅम्पसमधून टीसीएस 40 हजार विद्यार्थ्यांची भरती करणार

क्लाउड कम्प्यूटिंग, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर जागतिक कंपन्यांनी केलेल्या वाढीव गुंतवणूकीचा भारतीय आयटी सेवा कंपन्यांना फायदा झाला आहे. याशिवाय जागतिक कंपन्यांनीही सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे. इन्फोसिसचा प्रतिस्पर्धी टीसीएसने अलीकडेच सांगितले होते की ते कॅम्पसमधून 40,000 फ्रेशर्सना नोकर्‍या उपलब्ध करुन देणार आहेत. खासगी क्षेत्रातील आयटी कंपन्यांमध्ये टीसीएसकडे सर्वाधिक म्हणजे 5 लाख कर्मचारी आहेत. गेल्या वर्षीही कंपनीने 40 हजार पदवीधरांची भरती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com