Allahabad High Court Dainik Gomantak
देश

फौजदारी खटला प्रलंबित असताना पदोन्नती नाकारु शकत नाही: Allahabad HC

Allahabad High Court: फौजदारी खटला प्रलंबित असताना सरकारी कर्मचाऱ्याची बढती रोखता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Allahabad High Court: फौजदारी खटला प्रलंबित असल्याच्या कारणावरुन सरकारी कर्मचाऱ्याची पदोन्नती अनिश्चित काळासाठी रोखणे अयोग्य असल्याचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे. फौजदारी खटला प्रलंबित असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याची बढती रोखता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. पोलीस हवालदार नीरज कुमार पांडे यांच्या याचिकेवर वरिष्ठ वकील विजय गौतम यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर याचिका निकाली काढताना न्यायमूर्ती राजीव मिश्रा यांनी हा आदेश दिला आहे.

दरम्यान, याचिकेत डीजीपी मुख्यालयातून 1 जानेवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबल पदोन्नती यादीतील याचिकाकर्त्याच्या पदोन्नतीला आव्हान देण्यात आले. याचिकाकर्त्याची हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती सीलबंद कव्हरखाली ठेवण्यात आली होती. कारण त्याच्यावर प्रलंबित फौजदारी खटला चालू होता.

दुसरीकडे, याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विजय गौतम यांनी युक्तिवाद केला की, 'फौजदारी खटल्याच्या कारणास्तव याचिकाकर्त्याला यूपी पोलीस अधिकारी (शिक्षा आणि अपील नियम) 1991 च्या अधीनस्थ रँकच्या नियम 8(2)(b) अंतर्गत डिसमिस करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. ते पुन्हा पोलीस (Police) खात्यात कार्यरत राहिले.

तसेच, फौजदारी खटला प्रलंबित असतानाही याचिकाकर्त्याला सेवेत कायम करण्यात आले, तर मग त्याच फौजदारी खटल्याच्या आधारे पदोन्नती नाकारणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकिलांनी केला. उच्च न्यायालयाने (High Court) फौजदारी खटल्याच्या आधारे बडतर्फी रद्द करत पुनर्स्थापनेचे आदेश दिले होते. तर पुन्हा त्याच आधारावर पदोन्नती नाकारणे बेकायदेशीर असल्याचेही वकिलांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT