"Call Home Minister" Nitish Kumar forgets He Is Home Minister Of Bihar.  Dainik Gomatak
देश

Nitish Kumar: "गृहमंत्र्यांना फोन लावा" नितीश कुमार विसरले स्वत:चे खातं, जनता दरबारातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Nitish Kumar: घटना घडली तेव्हा नितीश कुमार त्यांच्या जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकत होते. या दरम्यान नितीशकुमार यांनी गृहमंत्र्यांना फोन लावण्यास सांगितल्यानंतर अधिकारीही गोंधळले.

Ashutosh Masgaunde

"Call Home Minister" Nitish Kumar forgets He Is Home Minister Of Bihar, Funny Video from Janata Darbar Goes Viral:

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात नुकतीच एक मजेशीर घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

लोकांशी संवाद साधताना नितीशकुमार यां ते राज्याचे गृहमंत्री आहेत याचा विसर पडला. घटना घडली तेव्हा नितीश कुमार त्यांच्या जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकत होते. या दरम्यान नितीशकुमार यांनी गृहमंत्र्यांना फोन लावण्यास सांगितल्यानंतर अधिकारीही गोंधळून गेल्याचे दिसले.

जनता दरबारात नितीश कुमार (Nitish Kumar) एका व्यक्तीच्या तक्रारी ऐकत होते. एका प्रकरणाच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन वर्षे उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. ते म्हणाले की 2021 मध्ये एफआयआर नोंदविण्यात आला होता परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.

त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून नितीश कुमार यांनी आपल्या अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांना फोन करण्यास सांगितले. नितीशकुमार हेच राज्याचे गृहमंत्रीही असल्याने त्यांच्या आदेशानंतर अधिकारी संभ्रमात पडले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी जनता दरबारत सुमारे 51 लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. नितीश कुमार यांनी त्यांच्या तक्रारी ऐकल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारींच्या संदर्भात आवश्यक कारवाई करण्यास सांगितले.

राज्यातील अनेक जिल्ह्यातून शेकडो लोक आले होते. त्यांच्याकडे विविध तक्रारी होत्या ज्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ऐकून घेतल्या. मात्र, या दरम्यान एका घटनेट मुख्यमंत्री आपण राज्याचे गृहमंत्री देखील आहोत हे विसरले, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली.

बिहार भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी या घटनेवर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची खिल्ली उडवली आणि म्हटले की ही बिहार सरकारची कॉमेडी आहे की शोकांतिका? याबाबत मी संभ्रमात आहे.

सोशल मीडियावर बोलताना ते म्हणाले, "इंजिनिअर मुख्यमंत्री हे विसरले की ते गृहमंत्रीही आहेत! बिहारमधील कारभाराची ही कॉमेडी आहे की शोकांतिका? मुख्यमंत्री पूर्णपणे नियंत्रणाबाहेर आहेत, त्यांच्यामध्ये विस्मरण किंवा स्मृतिभ्रंशाची लक्षणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT