Rahul Gandhi is Pappu from North India and Udayanidhi Stalin is Pappu from South India Says K Annamalai:
राहुल गांधी जसे मोदींबद्दल बोलायचे तसेचे उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माबद्दल (Sanatan Dharma) बोलत आहेत. त्यामुळे जसे राहुल गांधी हे उत्तर भारताचे पप्पू आहेत. तसेच उदयनिधी स्टॅलिन हे दक्षिण भारताचे पप्पू आहेत, अशी टीका तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांनी केली.
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील टीकेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेकांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.
तुतीकोरीन विमानतळावर पत्रकारांशी बोलताना तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई म्हणाले, “राहुल गांधी मोदींच्या समुदायाबद्दल जसे बोलले तसेच उदयनिधी स्टॅलिन हे सनातम धर्माबद्दल बोलले आहेत. त्यामुळे उत्तर भारताचे पप्पू राहुल गांधी तर दक्षिण भारताचे पप्पू उदयनिधी आहेत. ते असेच बोलत राहिले तर इंडिया आघाडीची व्होट बँक घसरत राहील.
आता इंडिया आघाडीची मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली आहे. उदयनिधी असेच बोलत राहिले तर इंडिया आघाडीची मते २० टक्क्यांपर्यंत कमी होतील.
येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीए बाजी मारणार हे निश्चित आहे. अगदी इंडिया टुडे पोलनेही NDA 317 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. मोदींचा प्रचार अजून बाकी आहे. ते प्रचारासाठी आले तर आम्ही 400 जागा जिंकू.
सहा टर्म सत्तेत राहूनही ते सामाजिक न्यायाच्या गप्पा मारत आहेत. ते सामाजिक न्याय मिळवून देऊ शकत नाहीत का? असा प्रश्न अण्णामलाई यांनी केला.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी अतिशय आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले होते की, सनातन धर्म (Sanatan Dharma) हा रोगासारखा आहे. त्यामुळे तो नष्ट करावा. त्यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली.
तामिळनाडूमध्ये 'संतनाम निर्मूलन अधिवेशन' आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान ते बोलत होते.
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे काहीही बदलू घडू नये, सर्व जसे आहे तसेच राहावे. पण द्रविड मॉडेल बदलाचेआणि सर्वांना समान अधिकार देण्याचे आवाहन करते.
भाजपने माझे विधान फिरवले असून खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. त्यांनी माझ्यावर जे काही खटले दाखल केले, त्याचा सामना करण्यास मी तयार आहे. भाजप इंडिया आघाडीला घाबरला आहे आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे सर्व बोलत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.