The Corona Vaccines Covishield and Covaxin Have Not Been Linked To Heart Attack or Potential Risks of Heart Attacks:
कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर, देशभरात हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस घेतल्यावर लोकांना हृदयविकाराचा झटका येतो का? यावरही मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चा होत असतात.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) देखील याबाबत अभ्यास करत आहे. यामध्ये कोरोना लसीकरण आणि देशातील तरुणांमध्ये वाढत्या हृदय विकाराच्या समस्या याबाबत अभ्यास सुरू आहेत. त्याचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे दिल्लीच्या जीबी पंत सरकारी रुग्णालयात केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या Covishield आणि Covaxin लसींचा हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या संभाव्य धोक्यांशी कोणताही संबंध नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अभ्यास ऑगस्ट 2021 आणि ऑगस्ट 2022 दरम्यान करण्यात आला. यामध्ये जीबी पंत रुग्णालयात दाखल असलेल्या 1578 रुग्णांचा डेटा वापरण्यात आला. यामध्ये हे पाहण्यात आले आहे की कोणत्या रुग्णाने कोरोना लस (Corona Vaccines) कधी घेतली? यामध्ये वयाचाही विचार करण्यात आला.
या संशोधनानंतर देशात बनवलेले Covishield आणि Covaxin हे दोन्ही सुरक्षित असल्याचा निर्वाळा जीबी पंत रुग्णालयाने दिली आहे. याउलट, संशोधनातून समोर आले आहे की ज्यांनी कोरोनाविरोधी लस घेतली त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी झाली होती.
देशात कोरोनाविरोधी लस (Corona Vaccines) घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने लोक मरत आहेत का, हा प्रश्न यापूर्वी अनेकदा उपस्थित झाला आहे. ICMR याबाबत अभ्यासही करत आहे. हा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
विशेष म्हणजे जर तुम्हाला छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ही लक्षणे हृदयविकाराची आहेत. त्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटणे.
विशेषत: मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. यापेक्षाही ही जीवनशैलीची समस्या आहे. अशा परिस्थितीत लोकांनी दर्जेदार जीवन जगण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
सुमारे सहा महिन्यांच्या विश्लेषणानंतर, संशोधकांना असेही आढळून आले की लसीकरण न केलेल्या (Corona Vaccines) लोकांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे.
तसेच वृद्ध, मधुमेह आणि धूम्रपान करणार्यांचा लस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाची लस केवळ सुरक्षितच नाही तर मृत्यूचे प्रमाण देखील कमी करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.