BSF foils Pakistan terror bid Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: सांबामध्ये BSF ची मोठी कारवाई; घुसखोरी करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

Terrorists Killed In Samba Jammu: जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला.

Manish Jadhav

ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील अनेक सीमावर्ती राज्यातील शहरांवर बुधवार-गुरुवारच्या (7-8 मे) मध्यरात्री ड्रोन हल्ले केले. याचदरम्यान आता, जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये एका मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. पाकिस्तानातून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांना बीएसएफने येथे ठार मारले.

मिळालेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मध्यरात्री दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो भारतीय लष्कराने हाणून पाडला. लष्कराने संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील जारी केला, ज्यामध्ये दहशतवादी घुसखोरी आणि गोळीबार करताना दिसत आहेत. लष्कराच्या या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानच्या (Pakistan) धंधार चौकीचे मोठे नुकसान झाले. या घुसखोरीच्या प्रयत्नात पाकिस्तानची BAT म्हणजेच बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचा सहभाग असू शकतो, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

दहशतवाद्यांना पाहताच लष्कराने गोळीबार केला

दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या वेळी लष्कराची तुकडी सीमेवर गस्त घालत होती. यावेळी त्यांची नजर दहशतवाद्यांवर पडली. रात्री 11.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला. लष्कराने अडवल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु लष्कराने गोळीबार सुरु केला. घुसखोरीच्या बाबतीत सांबा हे आधीच अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. भारत (India) आणि पाकिस्तानमधील सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येथे दक्षता वाढवण्याचे हेच कारण आहे.

भारताच्या कारवाईने पाकिस्तान हादरला

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केल्यापासून पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. भारत दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करत आहे, यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू विमानतळावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. या कारवाईत 50 हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. म्हणूनच पाकिस्तान सतत बदला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT