Subhas Chandra Bose
Subhas Chandra Bose Dainik Gomantak
देश

वडिलांचे अवशेष भारतात परत आणा, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची सरकारला विनंती

दैनिक गोमन्तक

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांचे स्मरण करत आहे. दरम्यान, जर्मनीमध्ये राहणारी नेताजींची मुलगी अनिता बोस फाफ (Anita Bose Pfaff) यांनी भारत सरकारकडे नेताजींचे अवशेष भारतात परत आणण्याची मागणी केली आहे. अनिता बोस यांनी यावेळी असेही म्हटले की, नेताजींच्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते. (Bring back her father remains to India Subhash Chandra Bose daughter pleads with the government)

'जपानी अधिकाऱ्यांनी गोळा केलेले अवशेष'

वास्तविक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातामध्ये झाल्याचा दावा केला जातो. त्यानंतर त्यांचे अवशेष एका जपानी अधिकाऱ्याने गोळा केले आणि टोकियो येथील रेन्कोजी मंदिरामध्ये जतन केले. तेव्हापासून पुजाऱ्यांच्या तीन पिढ्यांनी बोस यांच्या अवशेषांची काळजी घेतली आहे.

अनिता बोस म्हणाल्या की अवशेषांची डीएनए चाचणी करावी

अनिता बोस यांनी सांगितले की, जपानमधील टोकियो येथील मंदिरात जतन केलेल्या नेताजींच्या अवशेषांच्या डीएनए चाचणीसाठी त्या तयार आहेत. मंदिराचे पुजारी आणि जपान सरकारलाही या चाचणीला हरकत नसून ते अवशेष सोपवण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

'किमान त्यांचे अवशेष भारतीय भूमीत परत येऊ शकतात'

अनिता बोस यांनी आपल्या निवेदनात भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या जनतेला आवाहन केले की, नेताजींच्या आयुष्यात त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते आणि त्यामुळे आता वेळ आली आहे की किमान त्यांचे अवशेष भारतीय भूमीत परत येऊ शकतील. नेताजींच्या अस्थी मातृभूमीत परत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नेताजींचा मृत्यू हे इतिहासातील सर्वात मोठे रहस्य आहे असे म्हणायला हरकत नाही. नेताजींची एकुलती एक अपत्य अनिता बोस फाफ फार पूर्वीपासून नेताजींचे अवशेष रेनकोजी मंदिरात असल्याचे सांगत आहेत तर नेताजींच्या अनेक भारतीय नातेवाईकांनी तैवानमधून नेताजी कुठे गेले हे शोधण्यासाठी अनेकवेळा सरकारला विनंती केली आहे.

नेताजी आणि त्यांची पत्नी एमिली शेंकेल यांची कन्या अनिता

अनिता बोस फाफ, ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या अर्थशास्त्रज्ञ, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची पत्नी एमिली शेंकेल यांच्या कन्या आहेत तर ब्रिटीशांशी लढण्यासाठी नेताजी जर्मनीतून दक्षिण पूर्व आशियामध्ये गेले तेव्हा त्या अवघ्या चार महिन्यांच्याच होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT