NSA Ajit Doval Dainik Gomantak
देश

BRICS Meeting: एनएसए अजित डोवाल यांनी बैठकीत अफगाण संकटाचा मुद्दा केला उपस्थित

एनएसए अजित डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली आज ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर जगभरातील देश चिंता व्यक्त करत आहे. यातच आता ब्रिक्स (BRICS Meeting) एनएसए वर्च्युअल मीटवर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या उच्च प्रतिनिधींच्या बैठका ब्रिक्स देशांमधील राजकीय आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचे मंच म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांनी माहिती दिली की, आजच्या बैठकीत अफगाणिस्तान, इराण, मध्य पूर्व आणि आखाती देशांमधील सध्याच्या घडामोडी आणि सायबर सुरक्षेसारख्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी उदयोन्मुख धोक्यांच्या संदर्भात प्रादेशिक आणि जागतिक राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. एनएसए अजित डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या अध्यक्षतेखाली आज ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बैठकीदरम्यान भारताने (India) सीमापार दहशतवाद आणि लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e Mohammed) सारख्या गटांच्या क्रियाकलापांचा मुद्दा उपस्थित केला, ज्यांना राज्याचं समर्थन आहे आणि शांतता व सुरक्षेला धोका आहे. त्याच वेळी, उच्च प्रतिनिधींनी ब्रिक्स शिखर परिषदेत विचार करण्यासाठी ब्रिक्स काउंटर टेररिझम अॅक्शन प्लान स्वीकारण्यात आला आहे आणि त्यासंबंधी शिफारस केली. दहशतवाद आणि दहशतवादविरोधी वित्तपुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याची यंत्रणा अधिक मजबूत करणे हे कृती आराखड्याचे उद्दिष्ट आहे.

संयुक्त प्रयत्नांना बळकटी देण्याचे मान्य केले

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात, माहिती आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सायबर गुन्ह्यांचा सामना आणि क्षमता निर्माण करुन सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त प्रयत्नांना बळकटी देण्याचे मान्य करण्यात आले. भारताने यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये डिजिटल फॉरेन्सिक्सवरील ब्रिक्स कार्यशाळेचे आयोजन केले होते.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याच्या एका आठवड्यानंतर ही बैठक झाली. ब्रिक्स (ब्राझील-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रिका) जगातील पाच सर्वात मोठ्या विकसनशील देशांना एकत्र आणते, जे जागतिक लोकसंख्येच्या 41 टक्के, जागतिक जीडीपीच्या 24 टक्के आणि जागतिक व्यापाराचे 16 टक्के प्रतिनिधित्व करतात.

बैठकीत कोण सहभागी होता?

या बैठकीला रशियन एनएसए जनरल पेट्रुशेव, चिनी पॉलिट ब्युरो सदस्य यांग जिची, ब्राझीलचे सुरक्षा अधिकारी जनरल ऑगस्टो हेलेना रिबेरो परेरा आणि दक्षिण आफ्रिकेचे उप राज्य सुरक्षा मंत्री नासेडिसो गुडनॉफ कोडावा उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत दहशतवाद, अतिरेकी आणि अतिरेकीपणाचा सामना करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमधील सखोल सहकार्यावर जोर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT