Shocking News In Dehradun Dainik Gomantak
देश

Shocking News: 7 तास थांबला श्वास... एकीकडे चिता रचली जात असताना अचानक 102 वर्षीय महिलेने उघडले डोळे

उत्तराखंडमधील घटना; डॉक्टरांनी 7 तासांपुर्वी मृत घोषित केले होते, नातेवाईक अवाक

Akshay Nirmale

Shocking News: उत्तराखंडमधील रुरकी गावात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता, तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. अंत्यसंस्कारासाठी सर्व नातेवाईकही पोहोचले. मात्र अचानक मृत महिलेच्या शरीरातील हालचाल पाहून सगळेच अवाक् झाले. या महिलेने तब्बल सात तासानंतर डोळे उघडले आणि सर्वानाच धक्का बसला. या महिलेचे वय 102 वर्षे आहे.

या प्रकाराने उपस्थित नातेवाईक, गावकऱ्यांचा कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण मृत वृद्ध महिलेने डोळे उघडल्यानंतर उपस्थित सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही.

ही घटना उत्तराखंडच्या मंगलोर भागातील आहे. मंगळूर भागातील नरसन खुर्द येथील रहिवासी असलेल्या विनोद यांची १०२ वर्षे वय असलेली आई ज्ञानदेवी काही दिवसांपासून आजारी होती. अचानक ती बेशुद्ध पडली, त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे कुटुंबात शोककळा पसरली.

कुटूंबीयांनी त्यांच्या मृत्यूची माहिती सर्व नातेवाईकांना दिली, त्यानंतर सर्व नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांच्या घरी जमा झाले. अंतिम संस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली होती. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेणार असतानाच अचानक ज्ञानदेवी यांच्या शरीरात काही हालचाल जाणवली.

त्यानंतर काही वेळातच ज्ञानदेवींनी डोळे उघडले. घरातल्यांनी त्यांना काही खायला हवे काय, असे विचारले असता या महिलेने चाट खायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नातेवाईकांनी लगेचच गावातून त्यांच्यासाठी चाट आणले. ते खाल्ल्यानंतर ज्ञानदेवी अगदी पुर्वीप्रमाणे सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागल्या.

महिलेच्या नातवाने सांगितले की, त्यांची आजी सुमारे सात तास मृत पडून होती. त्यानंतर तीने अचानक श्वास घेण्यास सुरुवात केली आणि अंत्यसंस्काराची तयारी झालेल्या घरात आनंदाचे वातावरण पसरले. विनोद यांच्या माहितीनुसार त्यांची आई संपूर्ण गावातील सर्वात वृद्ध महिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT