Boy In West Bengal Throws National Flag To The Ground On Independence Day. Dainik Gomantak
देश

Independence Day: संतापजनक!अल्पवयीन मुलाने राष्ट्रध्वज फेकला जमिनीवर; व्हिडिओ व्हायरल

Independence Day: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा दिसत आहे जो एका घराच्या टेरेसवर चढतो जिथे तो राष्ट्रध्वज खाली फेकताना दिसत आहे.

Ashutosh Masgaunde

Boy In West Bengal Throws National Flag To The Ground On Independence Day:

भारत आज आपले स्वातंत्र्याचे ७७ वे वर्ष साजरे करत असताना, स्वातंत्र्यदिनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अनादर करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आज ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एक मुलगा दिसत आहे जो एका घराच्या टेरेसवर चढतो जिथे भारतीय राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज फडकवला होता. मुलगा दोन्ही झेंडे काढून जमिनीवर फेकतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना पश्चिम बंगालच्या बसीरहाटमध्ये घडली, ज्यामध्ये हा मुलगा एका इमारतीच्या छतावर चढताना दिसत आहे.

छतावर चढल्यानंतर मुलाने प्रथम भगवा ध्वज छतावरून जमिनीवर फेकून दिला आणि त्यानंतर त्याने राष्ट्रध्वजावर हल्ला केला. त्याने छतावरून तिरंगा काढून जमिनीवर टाकला. त्यानंतर त्यांनी इमारतीवर लावलेली काही पोस्टर्स फाडली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावाने मुलाच्या या कृत्याकडे डोळेझाक केली. भगवा ध्वज काढत असताना त्यांनी मुलाला थांबवले असते तर राष्ट्रध्वजाचा अनादर टळला असता.

देश स्वातंत्र्याचे ७७ वे वर्ष साजरे करत असताना राष्ट्रध्वजाचा अवमान होणे अत्यत संतपजनक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. तसेच पंतप्रधानांनी राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली आहे.

'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) उपक्रमामुळे देशातील प्रत्येक घराघरात तिरंगा पोहोचेल, असे पंतप्रधान म्हणाले.

देशातील राष्ट्रध्वजाचा अनादर होण्याच्या अशा घटना टाळण्यासाठी भारतातील लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel: "..तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही"! 21 दिवसांपासून चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच; प्रकल्पाच्या निर्णयानंतर ठरवणार आंदोलनाची दिशा

ED Raid Anjuna: गोव्यात ईडीची मोठी कारवाई! 2.83 कोटींच्या सापडल्या नोटा; बँक खाती गोठवण्याचे आदेश

Birch Club Fire: 'ठोस नियम नसताना नाईटक्लबला परवानगी कशी दिली'? बर्चप्रकरणी सरपंचाच्या कोठडीसाठी पोलिसांचा युक्तिवाद

Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत आणणार अंथरुण

'त्या' रशियन पर्यटकाने केले 15 खून? सीरियल किलरने उडविली गोवा पोलिसांची झोप; संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT