Burj Khalifa: पाकिस्तानची नाचक्की तर तिरंग्याने उजळून निघाला बुर्ज खलिफा; पाहा व्हिडिओ

Independence Day: आज स्वातंत्र्यदिनानिमित्त जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा झळकला. त्यामुळे बुर्ज खलिफा तिरंग्यात उजळून निघाला.
Indian Flag Displayed At Burj Khalifa on Independence Day.
Indian Flag Displayed At Burj Khalifa on Independence Day.Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Flag Displayed At Burj Khalifa on Independence Day:

आज, भारताच्या स्वातंत्र्यदिनी, दुबईतील (Dubai) बुर्ज खलिफा ही जगातिल सर्वात उंच इमारत भारताच्या तिरंग्यात उजळून निघाली.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ वाजत असताना जगातील सर्वात उंच इमारत उजळून निघालेली दिसत आहे.

मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमधील अनेकांनाचा जळफळात झालेला पहायला मिळत आहे.

काय आहे प्रकार?

भारताचा शेजरी असलेल्या पाकिस्तानचा (Pakistan) स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्ट रोजी असतो. त्यामुळे 14 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये स्थायिक असलेले पाकिस्तानी नागरिक बुर्ज खलिफावर आपल्या देशाचा झेंडा झळकेल या आशेने 14 ऑगस्ट रोजी बुर्ज खलिफाच्या बाहेर जमा झाले होते.

मात्र 14 ऑगस्टला रात्रीचे 12 वाजल्यानंतर बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा काही फडकला नाही. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले पाकिस्तानी नागरिक निराश झाले होते.

जखमेवर मीठ

पाकिस्तानच्या 14 ऑगस्टनंतर 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन असतो. त्यामुळे 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता बुर्ज खलिफा इमारत भारताच्या तिरंग्याने उजळून निघाली.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना पाकिस्तान आणि त्यांच्या नागरिकांना सोशल मीडियावर ट्रोल केले.

Indian Flag Displayed At Burj Khalifa on Independence Day.
Independence Day 2023: पंतप्रधान मोदींचा या 'तीन' वाईट गोष्टींशी लढण्याचा निर्धार

अखेर पाकिस्तानचाही झेंडा झळकला

या सर्व प्रकारानंतर पाकिस्तानचाही ध्वज बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित करण्यात आला. ज्याचा व्हिडिओ आयकॉनिक स्ट्रक्चरच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला.

Indian Flag Displayed At Burj Khalifa on Independence Day.
Independence Day PM Modi Speech: 'मणिपूरमध्ये जेव्हा काही घडते तेव्हा...' जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 7 महत्वाचे मुद्दे

दरम्यान, भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात देशवासियांना परिवार संबोधून केली.

ते म्हणाले की, भारत लोकशाहीचा सण साजरा करत आहे. भाषणाच्या काही वेळातच पंतप्रधानांनी मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केले. तसेच विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com