Bowhead whale CIRBP protein Dainik Gomantak
देश

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

Bowhead whale CIRBP protein: विज्ञानाने आजवर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत, पण आता शास्त्रज्ञ चक्क मृत्यूला चकवा देऊन मानवी आयुष्य वाढवण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

Sameer Amunekar

न्यूयॉर्क: विज्ञानाने आजवर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत, पण आता शास्त्रज्ञ चक्क मृत्यूला चकवा देऊन मानवी आयुष्य वाढवण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आर्क्टिक महासागरातील 'बोहेड' नावाच्या व्हेल माशांवर केलेल्या एका ताज्या संशोधनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या माशांच्या शरीरात आढळणाऱ्या एका विशेष प्रथिनामुळे मानवी आयुर्मान २०० वर्षांपर्यंत पोहोचू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

काय आहे हे विशेष प्रथिन?

युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टरमधील शास्त्रज्ञांच्या मते, बोहेड व्हेलमध्ये 'CIRBP' नावाचे प्रथिन अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळते. हे प्रथिन इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत व्हेल माशांमध्ये तब्बल १०० पटीने जास्त असते.

विशेष म्हणजे, हे प्रथिन पेशींमधील 'डीएनए' दुरुस्त करण्याचे काम करते. वयानुसार माणसाच्या शरीरातील डीएनए खराब होत जातात, ज्यामुळे वृद्धत्व येते आणि विविध आजार जडतात. मात्र, 'CIRBP' या प्रक्रियेला रोखून शरीराला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करते.

प्रयोगातून समोर आले निष्कर्ष

शास्त्रज्ञांनी जेव्हा व्हेल माशांमधील हे प्रथिन मानवी पेशी आणि 'फ्रूट फ्लाय' (फळमाशी) यांच्यावर प्रयोगशाळेत वापरले, तेव्हा त्यांना धक्कादायक परिणाम पाहायला मिळाले. या प्रथिनामुळे मानवी पेशींची स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता कमालीची वाढली. तसेच, माश्यांच्या आयुर्मानातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यावरून असे स्पष्ट होते की, हे प्रथिन केवळ व्हेलसाठीच नाही, तर इतर जीवांच्या दीर्घायुष्यासाठीही वरदान ठरू शकते.

थंड पाण्याचा आणि आरोग्याचा संबंध

बोहेड व्हेल हे प्रामुख्याने आर्क्टिकमधील गोठवणाऱ्या थंडीत राहतात. संशोधनात असे आढळले की, कमी तापमानामुळे शरीरातील 'CIRBP' प्रथिनाची निर्मिती अधिक वेगाने होते. याच कारणामुळे शास्त्रज्ञ आता मानवी शरीरात या प्रथिनाचे प्रमाण वाढवण्यासाठी 'कोल्ड शॉवर' किंवा थंड पाण्याने स्नान करण्यासारख्या जीवनशैलीतील बदलांवर विचार करत आहेत. मात्र, अद्याप यावर अधिक सखोल संशोधनाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT