Assembly ByPoll Results Dainik Gomantak
देश

Assembly ByPoll Results: विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा; निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या

बिहारमध्ये राजद, तेलंगनात टीआरएस आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा उमेदवार विजयी

गोमन्तक डिजिटल टीम

ByPoll: देशातील 6 राज्यातील विधानसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपने 4 जागांवर विजय मिळवला आहे. यात उत्तरप्रदेशातील गोकर्णनाथ, बिहारमधील गोपालगंज, ओडिशातील धामनगर आणि हरियाणातील आदमपूर या जागांचा समावेश आहे.

बिहारमधील मोकामा येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या नीलम देवी यांनी विजय मिळवला. त्या बाहुबली नेता अनंत सिंह यांच्या पत्नी आहेत. तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. या सर्व जागांवर 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

या सर्व मतदारसंघात मिळून सर्वाधिक 75.25 टक्के मतदान हरियाणातील आदमपूर येथे झाले. तर महाराष्ट्रातील अंधेरी येथे सर्वात कमी 31.74 टक्के मतदान झाले.

उत्तरप्रदेशच्या लखीमपुरी खिरी येथील गोला गोकर्णनाथ जागेवर भाजपच्या अमन गिरी यांनी सपाचे उमेदवार विनय तिवारी यांना 34 हजार 298 मतांनी पराभूत केले. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील आदमपूरय येथे भाजप उमेदवार भव्य बिष्णोई यांनी 16 हजार 606 मतांनी विजय मिळवला.

बिहारमध्ये एक जागा राजदला तर एक जागा भाजपला मिळाली. मोकामा येथे राजदच्या नीलम देवी यांनी भाजपच्या सोनम देवी यांना 16 हजार 707 मतांनी पराभूत केले. तर गोपालगंज येथे भाजपच्या कुसुमदेवी यांनी राजदच्या मोहन गुप्ता यांच्यावर अखेरच्या फेरीत 2183 मतांनी विजय मिळवला.

महाराष्ट्रातील अंधेरीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. तेलंगणात मुनुगोडे येथे कुसुकुंतला प्रभाकर रेड्डी यांनी विजय मिळवला. तर ओडिशातील धामनगर येथे भाजपच्या सूर्यवंशी सूरज यांनी बिजू जनता दलाच्या अबंती दास यांना पराभूत केले. सूरज यांचे वडील आमदार बिष्णु चरण सेठी यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT