PM Modi Dainik Gomantak
देश

PM Modi's Kerala Visit: 'केरळमध्ये PM मोदींवर हल्ल्याची धमकी', भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाले पत्र!

PM Modi's Kerala Visit: केरळ भाजपचे प्रमुख के सुरेंद्रन यांनी आपल्याला धमकीचे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे.

Manish Jadhav

PM Modi's Kerala Visit: केरळ भाजपचे प्रमुख के सुरेंद्रन यांनी आपल्याला धमकीचे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये पीएम मोदींवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी सुरेंद्रन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा इशारा देणारे धमकीचे पत्र मिळाले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी केरळच्या (Kerala) पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि कोची वॉटर मेट्रोचे उद्घाटन करतील.

दुसरीकडे, कोची येथील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलेले पत्र एका आठवड्यात पक्षाच्या प्रादेशिक कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे सुरेंद्रन यांनी सांगितले. आता हे पत्र राज्याच्या डीजीपींना देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी एनके जॉनी नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला आहे. पत्रात या व्यक्तीचा पत्ता लिहिला होता. मात्र, मूळचा कोचीचा असलेल्या जॉनीने आपण पत्र लिहिले नसल्याचे म्हटले आहे.

त्याने असा दावा केला की, पत्र लिहिणारा कोणीतरी दुसरा असू शकतो, ज्याला त्यांच्याबद्दल राग आहे. जॉनीने पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी (Police) त्याच्या घरी येऊन पत्राबाबत चौकशी केली.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी देणार्‍या पत्राचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याशी संबंधित व्हीव्हीआयपी सुरक्षा योजना लीक केल्याबद्दल राज्य पोलिसांवर टीका केली.

ते म्हणाले की, “केरळमध्ये धार्मिक अतिरेकी संघटना खूप मजबूत आणि सक्रिय आहेत. राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा अहवाल माध्यमांसमोर आला आहे.

त्यात प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), SDPI आणि माओवाद्यांसह अनेक संघटनांचे संदर्भ आहेत. पण राज्य सरकार या संघटनांना संरक्षण देत आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT