BJP Dainik Gomantak
देश

BJP Second List Chhattisgarh: भाजपची दुसरी लिस्ट तयार, रमण सिंह यांच्यासह 50 नावांचा समावेश

Manish Jadhav

BJP Second List Chhattisgarh: छत्तीसगड भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी तयार केली आहे. यामध्ये रमण सिंह यांच्यासह 50 नावांना मंजुरी देण्यात आली आहे.

राजनांदगाव येथील डॉ. रमण सिंह, बसना येथील संपत अग्रवाल, लोर्मी येथील अरुण साओ आणि धारसीवान येथील अनुज शर्मा यांची नावे निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही यादी रात्री किंवा उद्या सकाळी कधीही प्रसिद्ध केली जाईल.

भाजपने सर्व खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी केल्याचे बोलले जात आहे. पन्नासहून अधिक जागांसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. दुसऱ्या यादीत तीन महामंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे.

वास्तविक, केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी दिल्लीत झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा समावेश होता. या बैठकीला अरुण साओ, रमण सिंग, नारायण चंदेल आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, केदार कश्यप, ओपी चौधरी, विजय शर्मा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. बिलासपूरमधून अमर अग्रवाल, रामपूरमधून ननकीराम कंवर, भिलाईनगरमधून प्रेम प्रकाश पांडे निवडणूक लढवू शकतात.

बिल्हामधून धर्मलाल कौशिक, जांजगीरमधून नारायण चंदेल, मस्तुरी कृष्णमूर्ती बांधी, बेलतारामधून रजनीश सिंग, कुरूडमधून अजय चंद्राकर, अरंगमधून खुशवंत सिंग यांना रिंगणात उतरवलं जाऊ शकतं.

विद्यमान आमदारांच्या कामावर लक्ष ठेवले जात असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशातील फॉर्म्युल्यानुसार नावे निश्चित केली जात आहेत.

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) विधानसभेच्या 90 जागा आहेत. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी भाजपने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये भाजपने 5 महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. वर्षअखेरीस राज्यात निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे.

मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT