BJP Candidate List Gujarat: Dainik Gomantak
देश

BJP Candidate List Gujarat: रविंद जडेजाच्या पत्नीला भाजपची उमेदवारी

गुजरात विधानसभेसाठी भाजपची 160 उम्मीदवारांची यादी जाहीर; केवळ 14 महिलांना तिकिट

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Candidate List Gujarat: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे, या यादीत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रविंद्र जडेजा याची पत्नी रीवाबा यांचाही समावेश आहे. रीवाबा या जामनगर उत्तर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हे घाटलोढिया येथून निवडणूक लढतील. भाजपच्या या यादीत केवळ 14 महिलांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे तिकिट कापले

भाजपने विद्यमान आमदारांपैकी 69 आमदारांना तिकीट दिले आहे तर 38 आमदारांची तिकीटे भाजपने कापली आहेत. या 38 ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ज्या आमदारांची तिकिटे कापली आहेत, त्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह नितिन पटेल, भूपेंद्र सिंह चूड़ासमा, आर. सी. फलदू, प्रदीप सिंह जडेजा, सौरभ पटेल यांचा समावेश आहे. या नेत्यांनी यापुर्वीच पक्षाला पत्र लिहून पक्षासाठी काम करणार असल्याचे म्हटले होते.

मोरबीच्या विद्यमान आमदारांनाही नाकारली उमेदवारी

या यादीवर 30 ऑक्टोबर रोजी घडलेल्या मोरबी येथील पुल दुर्घटनेचाही प्रभाव दिसून आला. मोरबीचे आमदार ब्रजेश मेरजा यांचेही तिकीट पक्षाने कापले आहे. त्यांच्याजागी कांतीलाल भाई यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या यादीत 2017 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या सात उमेदवारांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशीप योजनेत उद्योगांनी सहभागी व्हावे! गोवा औद्योगिक विकास महामंडळाची विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

Thivim Land Scam: थिवी जमीन गैरव्यवहार प्रकरण; सुलेमान सिद्दीकीला जामीन मंजूर, पोलिसांना 'सीएफएसएल' सादर करण्यात अपयश

Unlucky Zodiac Signs: अंगारक योगामुळे वाढणार अडचणी; 'या' तीन राशींनी कर्ज, गुंतवणूक आणि मोठे व्यवहार टाळावेत

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

SCROLL FOR NEXT