BJP President Bandi Sanjay Dainik Gomantak
देश

'निवडणुकीत KCR ने पैसे दिले तर घ्या, पण...': तेलंगणा भाजप अध्यक्ष

तेलंगणा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष बंदी संजय यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला.

दैनिक गोमन्तक

तेलंगणा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष बंदी संजय यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप केला. संजय यांनी लोकांना तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) कडून पैसे घ्या, पण भाजपला मतदान करा, असे आवाहन केले. भाजप नेत्याने रविवारी महबूबनगर जिल्ह्यातील पाथेरचेड गावात प्रजा संग्राम यात्रा काढली.

दरम्यान, या सभेला संबोधित करताना संजय म्हणाले, "केसीआर यांना विश्वास आहे की, त्यांनी पैसे दिले तर गरीब लोक त्यांना मतदान करतील. मी म्हणतो त्यांच्याकडून पैसे घ्या. अशा प्रकारे त्यांचा बँक बॅलन्स कमी होईल. नाहीतर ते आणखी श्रीमंत होतील आणि तुम्ही गरीबच राहाल. तुम्हाला पैसे घ्यावे लागतील, जर त्याने 5,000 किंवा 10,000 रुपये दिले तर ते स्वीकारा." (BJP president Bandi Sanjay accused Chandrasekhar Rao of distributing money for votes Did)

'पोटनिवडणुकीत लोकांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केले'

दुबक आणि हुजुराबाद पोटनिवडणुकीचा संदर्भ देत संजय म्हणाले की, टीआरएसने निवडणुकीपूर्वी पैसे वाटले, परंतु लोकांनी भाजपला (BJP) मतदान केले. "दुबक आणि हुजुराबाद पोटनिवडणुकीदरम्यान, टीआरएसने मतांसाठी 5,000 ते 10,000 रुपये वाटले, लोकांनी ते स्वीकारले परंतु मत मात्र त्यांनी भाजपला दिले."

ते पुढे म्हणाले की, ''या दोन्ही पोटनिवडणुकीत आम्ही टीआरएसच्या विद्यमान जागा जिंकल्या आहेत. त्याचप्रमाणे, ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत आम्ही 4 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. पुढील वर्षी तेलंगणा (Telangana) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT