Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

मोदी सरकारचा जलवा, 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप देशभरात आयोजित करणार कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने 26 मे रोजी देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने 26 मे रोजी देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. या अंतर्गत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. पुढील महिन्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि देशाची सत्ता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडे गेली.

Prime Minister Narendra Modi
आमदार जिग्नेश मेवाणी यांना जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात अटक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारने अशी अनेक लोककल्याणकारी कामे सुरु केल्याचा दावा करण्यात आला आहे, जी यापूर्वी कोणत्याही सरकारने केली नव्हती. भाजपचे म्हणणे आहे की, सरकारने देशात उज्ज्वला, जन धन, हर घर नल अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. सरकार आपल्या सर्व योजनांच्या मदतीने देशाला नव्या भारताच्या (India) निर्मितीकडे घेऊन जाण्याचा दावा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकार अमृत महोत्सवही साजरा करत आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "आठ वर्षांच्या मोठ्या चर्चेचा परिणाम म्हणून भारताकडे केवळ 8 दिवसांचा कोळसा साठा आहे."

Prime Minister Narendra Modi
प्रशांत किशोरांच्या प्रस्तावावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील हिंसाचारग्रस्त भागात बुलडोझर वापरल्याबद्दल सरकारवर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "द्वेषाचे बुलडोझर" थांबवण्याचे आणि वीज प्रकल्प सुरु करण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com