Randeep Singh Surjewala  Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Election: 'भाजप नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हत्येचा...', कॉंग्रेस नेत्याचा खळबळजक दावा

Randeep Singh Surjewala Allegation: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या प्रचारात राजकीय नेते द्वेषपूर्ण भाषणे करत आहेत.

Manish Jadhav

Randeep Singh Surjewala Allegation: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या प्रचारात राजकीय नेते द्वेषपूर्ण भाषणे करत आहेत. भाजप आणि कॉंग्रेस एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

यादरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजप नेत्यांवर मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. सुरजेवाला यांनी आपल्या भाषणात भाजप उमेदवाराचाही उल्लेख केला.

मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट आता भाजप नेते आखत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. हे आता चित्तापूरमधील भाजप उमेदवाराच्या रेकॉर्डिंगवरुन स्पष्ट झाले आहे.

बजरंग दलावरील बंदीवरुन वाद सुरु झाला

दुसरीकडे, कर्नाटकात बजरंग दलावरील बंदीवरुन सुरु झालेल्या वादात काँग्रेस (Congress) आता बॅकफूटवर दिसत आहे. काँग्रेसचे नेते आता राज्यात हनुमान मंदिर बांधण्याचे केवळ आश्वासन देत नाहीत, तर भाजपवर मंदिर पाडल्याचा आरोपही करत आहेत.

आता कर्नाटकात भाजपने पाडलेली मंदिरे आम्ही पुन्हा बांधू, असे काँग्रेस म्हणत आहे. राज्यात भाजपने हजारो मंदिरे पाडल्याचा दावा काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केला.

दीडशे वर्षे जुने मंदिर पाडल्याचा आरोप

पवन खेडा म्हणाले होते की, '36,000 मंदिरे पाडण्यात आली आहेत, त्यापैकी म्हैसूरजवळील 3,000 वर्षे जुने मंदिर पाडण्यात आले. तर बंगळुरुजवळील 150 वर्षे जुने मंदिर पाडण्यात आले.

मात्र आता, आमचे सरकार येताच पुन्हा ही मंदिरे उभारली जातील.' याशिवाय, बजरंग दल आणि बजरंग बली यांची तुलना करताना पवन खेडा संतप्त दिसले.

असा आरोप कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे की, 'काँग्रेस हतबल दिसत आहे. त्यामुळे सातत्याने चुका करत आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेसमध्ये विश्वासार्हता नाही. बजरंग बलीसमोर नतमस्तक झाल्यानंतर डीके शिवकुमार यांनी राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस हनुमानाची मंदिरे बांधणार असल्याची घोषणा केली.'

विशेष म्हणजे, कर्नाटकातील (Karnataka) बजरंग बलीवरुन राजकारण इतके तापले आहे की, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार मंदिरात पोहोचले आणि हनुमानासमोर नतमस्तक झाले. पंतप्रधान मोदींसह भाजपचे नेते देवाच्या नावावर राजकारण करत असून संवेदनशीलतेशी खेळत असल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT